Wimbledon 2018 : फेडेक्स सुसाट; उपांत्यपूर्व फेरीत धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 07:54 PM2018-07-09T19:54:32+5:302018-07-09T19:55:21+5:30
स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने एकही सेट न गमावता आगेकूच करण्याचे सत्र कायम राखताना विम्बल्डन टेनीस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
विम्बल्डन - स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने एकही सेट न गमावता आगेकूच करण्याचे सत्र कायम राखताना विम्बल्डन टेनीस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. फेडररने विम्बल्डन स्पर्धेत सोळापैकी 15वेळा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याने सोमवारच्या सामन्यात फ्रान्सच्या अॅड्रीयन मॅनेरीनोचा सरळ सेटमध्ये 6-0, 7-5, 6-4 असा पराभव केला. मी पुरेशी विश्रांती घेतली आहे, कारण येणारा आठवडा तंदुरूस्तीची कसोटी पाहणारा आहे, असे फेडररने सांगितले.
A 15th quarter-final in his last 16 appearances at #Wimbledon@rogerfederer brilliant record at The Championships continues... pic.twitter.com/lzlO67uJof
— Wimbledon (@Wimbledon) July 9, 2018
महिला गटात जर्मनीच्या अँजेलिक कर्बरने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताना स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेनिचचा 6-3, 7-6 (7/5) असा पराभव केला. जर्मनीच्याच ज्युलीया जॉर्जेसने 6-3, 6-2 अशा फरकाने क्रोएशियाच्या डोना व्हेकीचवर मात करत प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
A title favourite❓
— Wimbledon (@Wimbledon) July 9, 2018
Highest remaining seed @AngeliqueKerber progresses to the quarter-finals with a 6-3, 7-6(5) victory against Belinda Bencic #Wimbledonpic.twitter.com/Ny0FUjIlHG