Wimbledon 2018 : राफा’ची तिसऱ्या  फेरीत धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 09:31 PM2018-07-05T21:31:11+5:302018-07-05T21:31:40+5:30

जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू दिग्गज राफेल नदालने विम्बल्डन स्पर्धेची तिसरी फेरी गाठताना कझाखस्तानच्या मिखाइल कुकूशकिन याला सरळ तीन सेटमध्ये नमविले.

Wimbledon 2018: Rafa in third round | Wimbledon 2018 : राफा’ची तिसऱ्या  फेरीत धडक

Wimbledon 2018 : राफा’ची तिसऱ्या  फेरीत धडक

Next
ठळक मुद्देमहिलांमध्ये जर्मनीच्या अँजोलिका कर्बेरने पिछाडीवर पडल्यानंतर दमदार पुनरागमन करत विजयी कूच केली.

लंडन : जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू दिग्गज राफेल नदालने विम्बल्डन स्पर्धेची तिसरी फेरी गाठताना कझाखस्तानच्या मिखाइल कुकूशकिन याला सरळ तीन सेटमध्ये नमविले. त्याचवेळी सध्या आपला जुना फॉर्म मिळवण्यासाठी झगडत असलेला स्वित्झर्लंडच्या स्टॅनिसलास वावरिंका आणि मारिन सिलिच यांचे आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले. महिलांमध्ये जर्मनीच्या अँजोलिका कर्बेरने पिछाडीवर पडल्यानंतर दमदार पुनरागमन करत विजयी कूच केली.
 
१७ ग्रँडस्लॅम विजेत्या नदालने आतापर्यंत दोनवेळा विम्बल्डन जेतेपद उंचावले आहे. दुखापतीनंतर जबरदस्त पुनरागमन केलेल्या नदालने गेल्या दीड वर्षात तीन ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावली असून यात दोन फ्रेंच आणि एक अमेरिकन जेतेपदाचा समावेश आहे. नदालने जबरदस्त आक्रमक खेळ करताना मिखाइलचा सरळ तीन सेटमध्ये ६-४, ६-३, ६-४ असा धुव्वा उडवला. तगड्या नदालपुढे मिखाइलने क्वचितच आव्हान उभे केले. त्याचवेळी जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या क्रोएशियाच्या मरिन सिलिचला दुसºया फेरीतच पराभवाचा धक्का बसला. अर्जेंटिनाच्या गिडो पेला याने ३ तास १३ मिनिटांच्या अटीतटीच्या लढतीत आपल्याहून वरचढ असलेल्या सिलिचला ३-६, १-६, ६-४, ७-६(७-३), ७-५ असे पराभूत केले. पहिले दोन सेट गमावल्यानंतर पेलाने जबरदस्त पुनरागमन करताना आश्चर्यकारकपणे विजय मिळवला. 

दुसरीकडे, स्टार खेळाडू स्टॅन वावरिंकालाही दुसºया फेरीतूनच आपला गाशा गुंडाळावा लागला. इटलीच्या थॉमस फॅबिनो याने सरळ तीन सेटमध्ये बाजी मारताना वावरिंकाचे आव्हान ७-६(९-७), ६-३, ७-६(८-६) असे संपुष्टात आणले. याआधी जर्मनीचा अलेक्झांद्र झ्वेरेव, आॅस्ट्रियाचा डॉमनिक थिएम, स्पेनचा डेव्हिड फेरर यांनाही सुरुवातीच्या फेरीतून बाहेर पडावे लागल्याने यंदाची विम्बल्डन धक्कादायक निकालांनी गाजत आहे. सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचनेही तिसऱ्या फेरीत कूच केली असून त्याने अर्जेंटिनाच्या होरासिओ झेबालोस याला ६-१, ६-२, ६-३ असे पराभूत केले. 

महिलांमध्ये जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू अँजोलिका कर्बेरने तीन सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत अमेरिकेच्या क्लेर लियूला नमविले. लियूने पहिला सेट जिंकत आश्चर्यकारक आघाडी घेतली. यावेळी आणखी एक अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता होती. मात्र, अनुभवी कर्बेरने जबरदस्त मुसंडी मारताना सलग दोन सेट जिंकत ३-६, ६-२, ६-४ असा विजय मिळवून लियूला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. अव्वल खेळाडू रुमानियाच्या सिमोना हालेपनेही विजयी कूच करताना चीनच्या सैसै झेंग हिचा ७-५, ६-० असा धुव्वा उडवला.

Web Title: Wimbledon 2018: Rafa in third round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.