Wimbledon 2018 : सुपरमॉम सेरेनाची कमाल, जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 09:29 PM2018-07-12T21:29:19+5:302018-07-12T21:30:08+5:30
बाळंतपणानंतर टेनिस कोर्टवर परतलेल्या सेरेना विल्यम्सने विजयी धडाका कायम राखताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. जेतेपदाच्या लढतीत तिला जर्मनीच्या अँजेलिक कर्बरचा सामना करावा लागणार आहे.
लंडन - बाळंतपणानंतर टेनिस कोर्टवर परतलेल्या सेरेना विल्यम्सने विजयी धडाका कायम राखताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. जेतेपदाच्या लढतीत तिला जर्मनीच्या अँजेलिक कर्बरचा सामना करावा लागणार आहे. 2016च्या विम्बल्डन महिला एकेरीच्या जेतेपदाच्या सामन्यात सेरेना व अँजेलिका समोरासमोर आले होते.
अमेरिकेच्या सेरेनाने उपांत्य फेरीच्या सामन्यात जर्मनीच्या ज्युलिया जॉर्जेसचा 6-2, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. 2014 ते आत्तापर्यंत विम्बल्डन स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करताना तिने सलग 20 व्या विजयाची नोंद केली. तिने 2002 ते 2004 या कालावधीत केलेल्या सलग 20 सामन्यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.
"And @serenawilliams is *still* the queen of Centre Court"
— Wimbledon (@Wimbledon) July 12, 2018
The #Wimbledon final awaits... pic.twitter.com/gn2QVgj8QZ
कर्बरने उपांत्य फेरीत जेलेना ओस्टापेंकोवर 6-3, 6-3 असा सहज विजय मिळवला. उपांत्य फेरीत कर्बरचे मनोबल कमालीचे उंचावलेले पाहायला मिळाले. कारण सुरुवातीपासूनच कर्बरने सामन्यावर वर्चस्व ठेवले होते. दोन्ही सेट्समध्ये कर्बरने ओस्टापेंकोला वरचढ होण्याची संधी दिली नाही. दोन्ही सेट्समध्ये कर्बरने ओस्टापेंकोच्या सर्व्हिस सहजपणे मोडीत काढल्या.
#Wimbledon final spot booked in 67 minutes
— Wimbledon (@Wimbledon) July 12, 2018
Will we see @AngeliqueKerber lift the trophy on Saturday? pic.twitter.com/bTwiRmcHyp