Wimbledon : सामन्यादरम्यान एका महिलेवर फोकस झाला कॅमेरा, सर्वांनी उभं राहून वाजवल्या टाळ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 11:20 PM2021-06-28T23:20:57+5:302021-06-28T23:26:56+5:30
Wimbledon 2021 : पाहा कोण होत्या त्या महिला. का प्रेक्षकांनी उभं राहून वाजवल्या टाळ्या.
विम्बल्डनच्या एका सामन्यादरम्यान एका महिलेवर कॅमेरा फोकस झाल्यानंतर सर्व प्रेक्षकांनी उभं राहून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, या महिला म्हणजे सामान्य वायरोलॉजिस्ट सारा गिल्बर्ड होत्या. सारा गिल्बर्ट यांनी ऑक्सफर्ड अॅस्ट्राझेनका कोरोना लस (oxford AstraZeneca Vaccine coronavirus vaccine) विकसित केली होती. त्यांना आदर देण्यासाठी प्रेक्षकांनी उभं राहून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या.
विम्बल्डनच्या आयोजकांनी यावर्षी सुरुवातीचे सामने पाहण्यासाठी एनएचएस स्टाफ आणि कोरोना विषाणूची लस विकसित करणाऱ्या वैज्ञानिकांना व्हीआयपी रॉयल बॉक्समध्ये बसून सामने पाहण्यासाठी आमंत्रिक केलं होतं. यादरम्यान सारा गिल्बर्ड यादेखील सामना पाहण्यासाठी पोहोचल्या. नोवाक जोकोव्हीच जेव्हा ब्रिटनचा खेळाडू जॅक ड्रॅपर याला सर्व्हिस करत होता त्याच वेळी लाऊडस्पीकरवर एक अनाऊंसमेंट करण्यात आली.
An opening day on Centre Court with a difference...
— Wimbledon (@Wimbledon) June 28, 2021
A special moment as we say thank you to those who have played such an important role in the response to COVID-19#Wimbledonpic.twitter.com/16dW1kQ2nr
रॉयल बॉक्समध्ये कोरोना लस विकसित करणारे आणि नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसचे लोकं बसले असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना टाळ्या वाजवण्यास सुरूवात केली. तसंच जवळपास एक मिनिटापर्यंत त्या ठिकाणी उभं राहून प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. दरम्यान, स्पर्धा सुरू करण्यापूर्वीच हा एक भावूक क्षण असल्याचं कमेंट्री करत असलेल्या बोरिस बेकरनं म्हटलं.