विम्बल्डन रद्द, तरी खेळाडूंना मिळणार बक्षिसांची रक्कम!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 03:21 AM2020-07-12T03:21:20+5:302020-07-12T03:21:44+5:30

मुख्य स्पर्धेत खेळणाऱ्या २५६ खेळाडूंना प्रत्येकी २५ हजार पौंड मिळणार आहेत. पात्रता स्पर्धेत सहभागी होणाºया २२४ खेळाडूंना १२,५०० पौंड मिळणार आहेत.

Wimbledon canceled, but players will get prize money! | विम्बल्डन रद्द, तरी खेळाडूंना मिळणार बक्षिसांची रक्कम!

विम्बल्डन रद्द, तरी खेळाडूंना मिळणार बक्षिसांची रक्कम!

Next

लंडन : विम्बल्डन खुल्या टेनिसच्या इतिहासात कोरोनामुळे यंदा प्रथमच स्पर्धा रद्द झाली. तरीही सहभागी ६२० खेळाडूंना बक्षिसाची रक्कम देण्यात येणार आहे. विमा कंपनीसोबत चर्चा झाल्यावर आयोजकांनी हा निर्णय घेतला. मुख्य स्पर्धेत खेळणाऱ्या २५६ खेळाडूंना प्रत्येकी २५ हजार पौंड मिळणार आहेत. पात्रता स्पर्धेत सहभागी होणाºया २२४ खेळाडूंना १२,५०० पौंड मिळणार आहेत. ‘विम्बल्डन रद्द होण्याचा निर्णय झाला तेव्हापासूनच स्पर्धेची प्रतिष्ठा वाढवणाºया खेळाडूंसाठी काय करता येईल, याचा आम्ही सतत विचार करत होतो. कोरोनामुळे खेळाडूही आर्थिक संकटात आहेत, हा विचार आम्ही केला, ’ असे आॅल इंग्लंड क्लबचे सीइओ रिचर्ड लुईस यांनी सांगितले.या स्पर्धेच्या दुहेरीत सहभागी होणारे १२० खेळाडू, व्हीलचेअर प्रकारातील १६ तसेच चार खेळाडूंचा सहभाग असलेल्या व्हीलचेअर स्पर्धेतील खेळाडूंनादेखील मोठी रक्कम दिली जाईल.

Web Title: Wimbledon canceled, but players will get prize money!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tennisटेनिस