विम्बल्डन : राफेल नदाल अंतिम १६ मध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 02:12 AM2018-07-08T02:12:29+5:302018-07-08T02:14:28+5:30
विश्व नंबर वन आणि फ्रेंच ओपनची विजेतीे सिमोना हालेप हीला आज तैवानची खेळाडू सियेहू सू - वेई हिने पराभूत केले. तर दुसरीकडे पुरुष एकेरीत स्पेनचा अव्वल खेळाडू राफेल नदाल हा उपउपांत्यपूर्व फेरीत पोहचण्यात यशस्वी ठरला.
लंडन : विश्व नंबर वन आणि फ्रेंच ओपनची विजेतीे सिमोना हालेप हीला आज तैवानची खेळाडू सियेहू सू - वेई हिने पराभूत केले. तर दुसरीकडे पुरुष एकेरीत स्पेनचा अव्वल खेळाडू राफेल नदाल हा उपउपांत्यपूर्व फेरीत पोहचण्यात यशस्वी ठरला.
तैवानची सियेह सु वेई हिने विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीच्या लढतीत आज मोठा उलट फेर करताना जगातील नंबर वन खेळाडू सिमोना हालेप हिला पराभूत करत स्पर्धेच्या बाहेर केले.
रँकिंगमध्ये ४८ व्या स्थानावर असलेल्या सियेह हिने या लढतीत ३-६,६-४,७-५ ने विजय मिळवला. तिसºया सेटमध्ये ती एकवेळ २-५ अशी मागे होती. मात्र तीने ५-३ अशा मॅच पॉईंट स्कोरवर हालेपची सर्व्हिस तोडत शानदार पुनरागमन केले. सियेह पहिल्यांदाच कोणत्याही ग्रॅण्डस्लॅमच्या अंतिम १६ मध्ये पोहचली आहे.
सियेह हिने विजयानंतर सांगितले की,‘विश्व नंबर वन विरोधातील हा माझा पहिला विजय आहे. हे शानदार आहे. अखेरच्या सेटमध्ये २ -५ अशी पिछाडीवर होती.
मात्र प्रेक्षकांनी माझा उत्साह वाढवला.’ स्पर्धेत अव्वल महिला खेळाड़ू एकापाठोपाठ एक बाहेर पडत आहेत. हालेपच्या पराभवानंतर कॅरोलिना प्लिस्कोवा ही अव्वल १० मधील एकमेव खेळाडू या स्पर्धेत आहे. त्यामुळे सेरेना विल्यम्स हिला आठव्यांदा विम्बल्डन विजेतेपदाचा मार्ग थोडा सोपा होईल. स्पर्धेत दुसरे मानांकन प्राप्त नदाल याने एकतर्फी झालेल्या सामन्यात युवा खेळाडू डी मिनौर याला ६-१,६-२,६-४ असे पराभूत केले. फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावणाºया नदालचा पुढचा सामना फॅबियो फोगनिनी आणि जिरी वेस्ली यांच्यातील विजेत्या खेळाडूसोबत होईल.
द्विज शरण तिसºया फेरीत
भारताचा द्विज शरण आणि न्युझीलंडचा अर्टेम सिटाक यांनी विम्ब्लडन पुरुष दुहेरीत ज्युलियो पेराल्टा आणि होरासियो जेबालोसला पराभूत करत उपउपांत्यपूर्व फेरीत जागा मिळवली आहे. शरण आणि सिटाक यांनी साडेतीन तास चाललेल्या सामन्यात ६-७, ४-६, ६-३, ७-६, ६-४ असा विजय मिळवला.