Wimbledon Tennis 2018 : सेरेना, कर्बर, ओस्तापेंको उपांत्य फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 09:02 PM2018-07-10T21:02:08+5:302018-07-10T21:37:52+5:30
अमेरिकेच्या सेरेना विल्यम्ससह लॅटव्हियाच्या एलेना ओस्तापेंको आणि जर्मनीच्या अँजेलिका कर्बर यांनी आपआपल्या लढतीत सरळ दोन सेटमध्ये बाजी विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरी गटाची उपांत्य फेरी गाठली.
लंडन - अमेरिकेच्या सेरेना विल्यम्ससह लॅटव्हियाच्या एलेना ओस्तापेंको आणि जर्मनीच्या अँजेलिका कर्बर यांनी आपआपल्या लढतीत सरळ दोन सेटमध्ये बाजी विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरी गटाची उपांत्य फेरी गाठली. पुढील फेरीत दोन्ही खेळाडू एकमेकांविरुद्ध खेळतील. विशेष म्हणजे ओस्तापेंको विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवणारी लॅटव्हियाची पहिली खेळाडू ठरली. सुपरमॉन सेरेना विल्यम्सने इटलीच्या कॅमिला जिऑर्जीवर 3-6, 6-3, 6-4 असा विजय मिळवला.
“Once again, Serena reigns supreme on Centre Court!”@serenawilliams marches on...#Wimbledonpic.twitter.com/meRl9qB0l7
— Wimbledon (@Wimbledon) July 10, 2018
चार वर्षांपूर्वी ज्यूनिअर विम्बल्डन पटकावलेल्या ओस्टापेंकोने यंदाच्या सत्रात दमदार खेळ करत सर्वांचे लक्ष वेधले. स्लोवाकियाच्या डॉमनिका सिबुलकोवाला सरळ दोन सेटमध्ये ७-५, ६-४ असा धक्का देत ओस्टापेंकोने विजयी आगेकूच केली. फ्रेंच ओपनची माजी विजेती असलेल्या ओस्टापेंकोने याआधी झालेल्या आपल्या पाचही सामन्यात एकही सेट गमावलेला नाही, हे विशेष. दरम्यान, स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी बलाढ्य कर्बरचा पुढील सामन्यात सामना करावा लागणार असल्याने आता, ओस्तापेंकोला आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल.
First time in the #Wimbledon semi-finals…
— Wimbledon (@Wimbledon) July 10, 2018
Cue the celebrations 🎊 pic.twitter.com/VOQNaIuiMZ
कर्बरने आपला धडाकेबाज खेळ कायम राखताना रशियाच्या १४व्या मानांकीत डारिया कास्टाकिनाचे आव्हान ६-३, ७-५ असे संपुष्टात आणले. यासह कर्बरने तिस-यांदा विम्बल्डनच्या उपांत्य सामन्यात धडक मारली आहे. २०१६ साली अंतिम सामन्यात तिला सेरेना विलियम्सकडून पराभव पत्करावा लागला होता.
The moment @AngeliqueKerber went one step closer to a first #Wimbledon title... pic.twitter.com/9PFcNj8mpt
— Wimbledon (@Wimbledon) July 10, 2018
दुसरीकडे, सोमवारी रात्री उशिरापर्यंत खेळविण्यात आलेला सामना थांबविण्यात आल्यानंतर मंगळवारी अर्जेंटिनाच्या डेल पोत्रोने फ्रान्सच्या गाइल्स सिमॉनचे कडवे आव्हान चार सेटमध्ये परतावले. सिमॉनने कडवा प्रतिकार करताना डेल पोत्रोला विजयासाठी ४ तास २४ मिनिटांमपर्यंत झुंजवले. परंतु, अखेर डेल पोत्रोने ७-६(७-१), ७-६(७-५), ५-७, ७-६(७-५) असे नमविले. आता पुढच्या फेरीत डेल पोत्रोला जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू नदालविरुद्ध खेळायचे असून या दोघांमध्ये याआधी झालेल्या १५ सामन्यांमध्ये नदालने दहा, तर डेल पोत्रोने पाच सामने जिंकले आहेत.