युवा टेनिसपटू युकीचा खळबळजनक विजय, जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानावरील लुकासला दिला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 04:27 AM2018-03-13T04:27:27+5:302018-03-13T04:27:27+5:30

भारताचा आघाडीचा एकेरी टेनिसपटू युकी भांबरी याने आपल्या कारकिर्दीतील सर्वांत मोठा विजय मिळवताना जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी असलेल्या लुकास पोउलो याला पराभवाचा धक्का दिला.

Young tennis player Yuki's thrilling win, world number 12, gave Lukasake a push | युवा टेनिसपटू युकीचा खळबळजनक विजय, जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानावरील लुकासला दिला धक्का

युवा टेनिसपटू युकीचा खळबळजनक विजय, जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानावरील लुकासला दिला धक्का

Next

इंडियन वेल्स (यूएस) : भारताचा आघाडीचा एकेरी टेनिसपटू युकी भांबरी याने आपल्या कारकिर्दीतील सर्वांत मोठा विजय मिळवताना जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी असलेल्या लुकास पोउलो याला पराभवाचा धक्का दिला. युकीने या अनपेक्षित निकालासह इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेत खळबळ माजवताना दिमाखात तिस-या फेरीत धडक मारली आहे.
जागतिक क्रमवारीत ११०व्या स्थानी असलेल्या युकीने स्पर्धेत नववे मानांकन लाभलेल्या फ्रान्सच्या लुकासला सरळ दोन सेटमध्ये ६-४, ६-४ असे पराभूत केले. एक तास १४ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या शानदार सामन्यात युकीने जबरदस्त खेळ करताना स्पर्धेत धक्कादायक विजयाची नोंद केली. पात्रता फेरीतून स्पर्धेची मुख्य फेरी गाठलेल्या युकीच्या कारकिर्दीतील हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा विजय ठरला. याआधी युकीने आॅगस्ट २०१७ मध्ये सिटी ओपन स्पर्धेत जागतिक क्रमवारीत २२व्या स्थानी असलेल्या गोएल मोंफिल्स याला पराभूत करत खळबळ माजवली होती.
पुढच्या फेरीत युकीपुढे अमेरिकेच्या सॅम क्वेरी याचे तगडे आव्हान असेल. क्वेरीने जर्मनीच्या मीशा झ्वेरेव याचा ६-४, ७-५ असा पराभव करत विजयी कूच केली आहे. पुरुष दुहेरी गटामध्ये भारताच्या रोहन बोपन्ना - एडुआर्ड रॉजर वेसलीन या जोडीचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. (वृत्तसंस्था)
>जोकोचे आव्हान संपुष्टात...
एकीकडे युकीने अनपेक्षित निकालाने सर्वांचे लक्ष वेधले असताना, जपानच्या तारो डॅनियलने दिग्गज खेळाडू नोवाक जोकोविचचे आव्हान संपुष्टात आणत सनसनाटी विजय मिळवला. तारोने जबरदस्त झुंज देताना तीन सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात पाचवेळचा चॅम्पियन जोकोविचचे तगडे आव्हान ७-६, ४-६, ६-१ असे परतावले. उजव्या हाताचा कोपरा दुखावल्याने विम्बल्डननंतर मागील सत्रात जोकोविच खेळला नव्हता. विशेष म्हणजे दुखापतीनंतर पुनरागमनाच्या प्रयत्नात असलेल्या जोकोची ही दुसरीच स्पर्धा होती.
2014 साली चेन्नई ओपन स्पर्धेतही
युकीने असाच अनपेक्षित विजय मिळवताना जागतिक क्रमवारीत १६व्या स्थानी असलेल्या फेबियो फोगनिनी याला पराभूत केले होते. मात्र, त्या वेळी फोगनिनी याने दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडला होता.45इंडियन वेल्समधील या धमाकेदार विजयामुळे युकीला आता
४५ गुणांचा फायदा होणार असून ४७,१७० डॉलरचे पारितोषिकही मिळेल.मोठा विजय
आतापर्यंत युकीने कोणतेही मोठे जेतेपद पटकावले नसले, तरी हा विजय त्याच्यासाठी एका जेतेपदापेक्षा कमी नाही.
>जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या दिग्गज रॉजर फेडररने दुसºया फेरीत विजय मिळवत आगेकूच केली. पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यात फेडररने फेडरिको डेलबोनिस याला ६-४, ७-६ असे नमविले.
पावसामुळे सामना काही वेळ थांबविण्यात आला, त्या वेळी फेडरर दुसºया सेटमध्ये २-२ असा बरोबरीत होता. तब्बल १७व्यांदा या स्पर्धेत खेळत असलेल्या फेडररने उपांत्य फेरी गाठल्यास जागतिक क्रमवारीतील त्याचे अव्वल स्थान मजबूत होईल.

Web Title: Young tennis player Yuki's thrilling win, world number 12, gave Lukasake a push

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.