झ्वेरेवची आता जेतेपदासाठी अंतिम फेरीत धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 00:06 IST2020-09-13T00:05:47+5:302020-09-13T00:06:04+5:30
आता जेतेपदासाठी झ्वेरेव आणि थीम यांच्यादरम्यान अंतिम झुंज होईल.

झ्वेरेवची आता जेतेपदासाठी अंतिम फेरीत धडक
न्यूयॉर्क : दोन सेटने पिछाडीवर पडल्यानंतर शानदार पुनरागमन करीत अलेक्जेंडर झ्वेरेवने पाब्लो कारेनो बस्टा याला नमवत अमेरिकन ओपन पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली. आता जेतेपदासाठी झ्वेरेव आणि थीम यांच्यादरम्यान अंतिम झुंज होईल. जर्मनीचा २३ वर्षीय स्टार झ्वेरेव पहिल्या दोन सेटमध्ये फॉर्मात नसल्याचे दिसले, पण त्यानंतर त्याने जबरदस्त पुनरागमन करत बस्टाचा ३-६, २-६, ६-३, ६-४, ६-३ ने पराभव केला. दुसरीकडे, आॅस्ट्रियाच्या थीमने दानिल मेदवेदेवला ६-२, ७-६, ७-६ असे नमविले.