भिवंडीत बांधकाम व्यवसायिकांनी केली १ कोटी ३३ लाखांची फसवणूक; पाच जणांविरोधात गुन्हा
By नितीन पंडित | Published: February 15, 2024 06:46 PM2024-02-15T18:46:30+5:302024-02-15T18:46:45+5:30
निवासी इमारती बांधून या निवासी इमारतीत राहण्यासाठी घर देतो असे सांगून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा फ्लॅट न देता १ कोटी ३३ लाख २५ हजार ५३७ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन पंडित
भिवंडी: निवासी इमारती बांधून या निवासी इमारतीत राहण्यासाठी घर देतो असे सांगून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा फ्लॅट न देता १ कोटी ३३ लाख २५ हजार ५३७ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बांधकाम व्यावसायिक उदयन महेंद्र शाह, कांतीलाल रतनलाल शहा दोघे रा.ठाणे,विनोद विठ्ठल लासे , निर्मला विनोद लासे,रचना पारेख रा.भिवंडी असे फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यवसायिकांची नावे आहेत त्यांनी मानकोली नाका परिसरातील वोल्वो शोरूम जवळ निवासी इमारती बांधून त्यात फ्लॅट देतो अशी बतावणी करीत ठाणे येथील अंजली संतोष मयेकर वय ५० वर्ष व इतर नागरिकांकडून सन २०१५ पासून १ कोटी ३३ लाख २५ हजार ५३७ रुपयांची रक्कम घेतली होती.मात्र त्यांना आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे बिल्डिंगचे काम पूर्ण केले नसून फ्लॅटचा ताबा दिला नसल्याने अखेर अंजली मयेकर यांनी नारपोली पोलीस ठाण्यात बुधवारी पाचही बांधकाम व्यवसायिकां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.