उल्हासनगर पोलीस परिमंडळातून चोरीला गेलेला १ कोटी ४१ लाखाचा मुद्देमाल नागरिकांना परत
By सदानंद नाईक | Published: October 13, 2023 07:16 PM2023-10-13T19:16:33+5:302023-10-13T19:17:53+5:30
३२३ मोबाईल, ५४ वाहनाचा समावेश
सदानंद नाईक, उल्हासनगर : उल्हासनगर पोलीस परिमंडळ-४ च्या अंतर्गत येणाऱ्या ८ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सन-२०२२-२३ वर्षात चोरीला गेलेला १ कोटी ४१ लाख किंमतीचा मुद्देमाल शुक्रवारी टॉउन हॉल मध्ये नागरिकांना परत दिला. यामध्ये एकून ३२३ मोबाईल, ५४ विविध वाहने तर ४४ लाख ४८ हजार रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा समावेश असल्याची माहिती उपायुक्त सुधाकर पाठारे यांनीं दिली आहे.
उल्हासनगर पोलीस परिमंडळ अंतर्गत ८ पोलीस ठाणे येत असून सन-२०२२-२३ साली चोरीला गेलेल्या सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, वाहने, मोबाईल आदींचा शोध पोलीसांनी लावला आहे. शुक्रवारी दुपारी ४ वाजता झालेल्या कार्यक्रमात चोरीला गेलेला १ कोटी ४१ लाख ९७ हजार ३४४ रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना परत केला. यामध्ये ४४ लाख ४८ हजार ६२५ रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, ६ लाख १६ हजार ६२० रुपये रोख रक्कम, ८ लाख ८२ हजाराची विविध वाहने, ४२ लाख ३ हजार ४९ रुपयांची एकून ३२३ मोबाईल आदी मुद्देमालाचा समावेश आहे.
शहरातील टॉउन हॉल मध्ये पार पडलेल्या कार्यक्रमला आमदार किशन कथोरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, गणपत गायकवाड, बालाजी किणीकर, कुमार आयलानी यांच्यासह पोलीस सह आयुक्त दत्तात्रय कराळे, अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे, सहायक पोलिस आयुक्त अमोल कोळी यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते. चोरीला गेलेले सोन्या-चांदीचे दागिने, वाहने, मोबाईल मिळाल्याने, नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. तर चोरून गेलेला मुद्देमाल नागरिकांना परत करतो. याबाबत पोलीस अधिकारीसह पोलिसात अभिमान दिसत होता. नागरिकांनी चार चौघात वावरतांना दक्ष असले पाहिजे, असा सल्लाही पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांनी दिला आहे.