राष्ट्रवादीचे नगरसेवक फोडण्यासाठी १ कोटींचे आमीष; जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

By अजित मांडके | Published: January 27, 2023 07:33 PM2023-01-27T19:33:30+5:302023-01-27T19:33:38+5:30

ठाण्यातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून गळाला लावण्याचे प्रकार सुरु असतांनाच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याच शिवसेनेवर आता गंभीर आरोप केला आहे.

1 crore bait to break NCP corporators; Jitendra Awad's serious allegation | राष्ट्रवादीचे नगरसेवक फोडण्यासाठी १ कोटींचे आमीष; जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

राष्ट्रवादीचे नगरसेवक फोडण्यासाठी १ कोटींचे आमीष; जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

Next

ठाणे : ठाण्यातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून गळाला लावण्याचे प्रकार सुरु असतांनाच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याच शिवसेनेवर आता गंभीर आरोप केला आहे. पैशवाल्या शिवसेनेच्या नेत्यांकडून कळवा-मुंब्र्यामधील नगरसेवकांना खुलेआम १ कोटींची ऑफर दिली जात असल्याचा गंभीर आरोप आव्हाडांनी केला आहे. तसेच पत्नीला देखील १ कोटी आणि नगरसेवक असेल तर तुला तिकीट देतो आणि आता तुला १० कोटी रु पयांची कामे देतो अशा पध्दतीने राष्ट्रवादी फोडण्याची पध्दत अवलंबली जात असल्याचा दावा त्यांनी टीट¦ीरद्वारे केला आहे.

मागील काही दिवसापासून राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठय़ावर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यात कळवा - मुंब्रा भागातील नगरसेवक फोडण्याची तयारी देखील बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीमधील मुंब्य्रातील काही माजी नगरसेवकांनी आव्हाड यांच्या विरोधात मोर्चा उघडला असून मुंब्रा विकास आघाडी सुरु करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. तर राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आव्हाड यांच्या विरोधात हा पर्याय उभा करणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र दुसरीकडे शिवसेनेत फुट पडल्यामुळे गेली ३० वर्षे ठाणे महापालिकेवर असलेली सत्ता गमावण्याची भीती दोन्ही गटाला आहे. त्यामुळे सध्या फोडाफोडीचे राजकारणही सुरू झाले आहे. मात्र आगामी पालिका निवडणुकीत सत्तेची चावी कळवा- मुंब्राच्या नगसेवकांकडे असणार आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्राबल्य असल्याने बाळासाहेबांच्या शिवसेनेने मिशन राष्ट्रवादी सुरू केले आहे.

त्यावर आव्हाड यांनी ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे. नगरसेवकाला आणि त्याच्या पत्नीला प्रत्येकी एक कोटींची खुलेआम ऑफर दिली जात असल्याचा आरोप या ट्विटमध्ये करण्यात आला आहे. यशिवाय नगरसेवक पदासाठी तिकीट देतो आणि आता १० कोटींची कामेही देतो असे आमीष दाखवले जात असल्याच आरोप त्यांनी ट्विटमध्ये केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Web Title: 1 crore bait to break NCP corporators; Jitendra Awad's serious allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे