डिसेंबरअखेर ३८१ कोटी मालमत्ताकराची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 12:14 AM2020-01-02T00:14:11+5:302020-01-02T00:14:23+5:30

मुंब्रा मागे; माजिवडा-मानपाडाची आघाडी

1 crore property levy collected at the end of December | डिसेंबरअखेर ३८१ कोटी मालमत्ताकराची वसुली

डिसेंबरअखेर ३८१ कोटी मालमत्ताकराची वसुली

Next

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्ताकर विभागाने ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत ३८१ कोटी रु पयांची करवसुली केली आहे. यामध्ये माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमधून सर्वाधिक म्हणजेच ११४ कोटी वसूल केले आहेत. तर, दुसरीकडे मुंब्रा आणि दिवा हे दरवर्षीप्रमाणे मागे पडले असून या दोन्ही प्रभाग समितींकडून डिसेंबरअखेर केवळ ३२ कोटींचीच वसुली झाली आहे. तर, मागील वर्षीच्या तुलनेत २०१९ डिसेंबरअखेरपर्यंत महापालिकेच्या करवसुलीत २० कोटींची वाढ झाली आहे.

महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. महापालिकेने या आर्थिक वर्षात करनिर्धारण व वसुलीसाठी विविध योजना राबविल्या आहेत. २० करसंकलन केंद्राबरोबरच मोबाइल व्हॅनद्वारेदेखील नागरिकांना कर भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.

मुंब्रा आणि दिवा प्रभाग समितीमध्ये विविध उपाययोजना करूनही दरवर्षीप्रमाणे मागील वर्षीदेखील वसुलीत पालिकेला अपयश आले आहे. मुंब्रा प्रभाग समितीअंतर्गत ३१ डिसेंबरपर्यंत केवळ १२ कोटी रु पयांची वसुली झाली. तर, दिव्यात २० कोटींची वसुली झाली. मागील वर्षी ३१ डिसेंबरअखेर ३६१ कोटी रुपयांची वसुली केली होती. यंदा मात्र त्यात २० कोटी रु पयांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. डिसेंबरअखेर ३८१ कोटींची वसुली झाल्याची माहिती उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली. त्यातही यावर्षी एकूण वसुलीत ३७ कोटींच्या थकबाकीचा समावेश आहे.

६५० कोटींचे उद्दिष्ट
महापालिकेच्या कर विभागाला मार्चअखेरपर्यंत ६५० कोटींचे उद्दिष्ट दिले आहे. आता डिसेंबरअखेर ३८१ कोटींचे उद्दिष्ट गाठण्यात यश आले आहे. त्यामुळे उर्वरित तीन महिन्यांत या विभागाला २६९ कोटींचे उद्दिष्ट गाठावे लागणार आहे.

Web Title: 1 crore property levy collected at the end of December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.