ठाणे महापालिका हद्दीत १ हजारांचा आकडा पार, कोविड जिल्हा रुग्णालयात तिसरी प्रसूती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 08:14 PM2020-05-16T20:14:31+5:302020-05-16T20:14:57+5:30
ठामपा कार्यक्षेत्रात शनिवारी सर्वाधिक 94 नवीन रुग्ण आढळून आल्याने तेथील रुग्ण एक हजार 90 इतकी झाली आहे. त्या खालोखाल नवीमुंबईत 80 रुग्णांची नोंदणी झाल्याने एकूण रुग्ण संख्या एक हजार 128 वर पोहोचली आहे
ठाणे - जिल्ह्यात शनिवारी सर्वाधिक 289 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या तीन हजार 432 झाली आहे. तर आज आणखी 5 जण दगावले आहेत. सर्वात जास्त 94 रुग्ण हे ठाणे महापालिका हद्दीत नोंदवल्याने ठामपाने नवीमुंबई पाठोपाठ एक हजारांचा टप्पा पार केला आहे. त्याचबरोबर मिराभाईंदरने तिनशेचा आणि उल्हासनगरने शंभराचा आकडा गाठला आहे. तर नवीमुंबई 80 रुग्ण मिळून आले असून तेथे तिघांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर सर्वात कमी एका रुग्णाची नोंद ही अंबरनाथ येथे झाली आहे. दुसरीकडे ठाणे जिल्हा कोविड रुग्णालयात पॉझिटिव्ह म्हणून दाखल झालेल्या गर्भवती महिलेची प्रसूती करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. तर बाळ बाळंतिण हे सुखरूप असल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.
ठामपा कार्यक्षेत्रात शनिवारी सर्वाधिक 94 नवीन रुग्ण आढळून आल्याने तेथील रुग्ण एक हजार 90 इतकी झाली आहे. त्या खालोखाल नवीमुंबईत 80 रुग्णांची नोंदणी झाल्याने एकूण रुग्ण संख्या एक हजार 128 वर पोहोचली आहे. त्यातच आज तिघांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 26 झाला आहे.कल्याण डोंबिवलीत 35 नवे रुग्णांची नोंद झाल्याने रुग्ण संख्या 459 वर गेली आहे. तसेच एकाचा मृत्यू ही झाल्याने मृतांचा आकडा 10 झाला आहे. ठाणे ग्रामीणमध्ये 24 रुग्ण सापडल्याने तेथील रुग्ण 165 झाली आहे. 21 नवे रुग्ण हे मिराभाईंदर येथे आढळून आल्याने एकूण रुग्ण संख्या 312 झाली असून तेथे एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 9 झाला आहे. बदलापूरला 19 रुग्ण मिळून आल्याने रुग्ण संख्या 98 वर गेली आहे. उल्हासनगर येथे 12 नवे रुग्ण निदान झाल्याने रुग्ण संख्या 106 इतकी झाली आहे. भिवंडीत 5 जण सापडल्याने तेथील रुग्ण संख्या 41 झाली आहे. सर्वात कमी 1 रुग्ण हा अंबरनाथमध्ये मिळाल्याने तेथील रुग्ण 33 झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
पुन्हा ठाण्याच्या कोविड रुग्णालयात डिलिव्हरी
शनिवारी ठाण्यात राहणाऱ्या 25 वर्षीय कोविड पॉझिटिव्ह गर्भवती महिलेने तीन किलो वजनाच्या बाळा जन्म दिला आहे. ही जिल्ह्यातील तिसरी डिलिव्हरी असून त्या महिलेला 14 मे रोजी उपचारार्थ दाखल केले होते. तिची जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. स्वाती पाटील यांनी ही डिलिव्हरी केली.ते मायलेक सुखरूप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.