10 बसेसचं ॲम्ब्युलन्समध्ये रूपांतरण, प्रत्येकात ब्रदर आणि अटेंडन्टची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 08:23 PM2020-05-17T20:23:55+5:302020-05-17T20:25:01+5:30

कोरोनाच्या विरूद्ध लढण्यासाठी ठामपा सरसावली

10 buses converted into ambulances, appointment of brother and attendant in each MMG | 10 बसेसचं ॲम्ब्युलन्समध्ये रूपांतरण, प्रत्येकात ब्रदर आणि अटेंडन्टची नियुक्ती

10 बसेसचं ॲम्ब्युलन्समध्ये रूपांतरण, प्रत्येकात ब्रदर आणि अटेंडन्टची नियुक्ती

Next

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कोरोना कोव्हीड 19 रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी चक्क टीएमटीच्या बसेस ॲम्ब्युलन्समध्ये रूपांतरित करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला असून रविवारी संध्याकाळ पर्यंत पाच बस ॲम्ब्युलन्स कोरोना विरूद्धच्या लढाईत सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व बसेसमध्ये तीन पाळ्यामध्ये ब्रदर्स आणि अटेडंटची नियुक्ती करण्यात आली आहे.पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सुचनेच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
            
कोरोनाविरूद्धचा लढा अधिक तीव्र करताना त्यासाठी लागणाऱ्या सुविधांची वानवा भासू नये या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सिंघल यांनी हा निर्णय घेतला असून ठाणे परिवहनच्या दहा बसेस आता ॲम्ब्युलन्स म्हणून वापरण्यात येणार आहेत. एका बसमध्ये दोन बेडस् बसविण्यात आले असून ड्रायव्हरच्या केबिनपासून ॲम्ब्युलन्सचा भाग पार्टीशनच्या साहाय्याने पूर्णतः स्वतंत्र ठेवण्यात आला आहे. सदरच्या बस ॲम्ब्युलन्स तीन पाळ्यांमध्ये चालविण्यात येणार असून या प्रत्येक बसेमध्ये प्रत्येक पाळीमध्ये एक ब्रदर आणि एक अटेडंट नियुक्त करण्यात आले आहेत. यातील पहिल्या पाच बस ॲम्ब्युलन्स आज सायंकाळपासून सेवेत रूजू होत असून उर्वरित 5 बसेस उद्या सायंकाळपर्यंत पूर्ण क्षमतेने चालणार आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे याचे नियंत्रण ठेवण्यात आले असून या सेवेसाठी 022-25399828 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title: 10 buses converted into ambulances, appointment of brother and attendant in each MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.