भरदिवसा ज्वेलर्सचे दुकान फोडून 10 किलो सोने लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2017 09:11 PM2017-10-08T21:11:39+5:302017-10-08T21:12:02+5:30
अंबरनाथ शिवाजी चौक या वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या सागर ज्वेलर्सचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 8 ते 10 किलो सोने लंपास केले आहे.
अंबरनाथ : अंबरनाथ शिवाजी चौक या वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या सागर ज्वेलर्सचे दुकान फोडुन अज्ञात चोरट्यांनी तब्बल 8 ते 10 किलो सोने लंपास केले आहे. हा सर्व प्रकार दुपारी 2 च्या सुमारास घडला आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून दुकानातील सोन्याचा हिशोब केल्यावर नेमके सोने किती चोरले याची नोंद करण्यात येणार आहे.
अंबरनाथ शिवाजी चौक या ठिकाणी सागर ज्वेसर्ल हे दुकान आहे. शहरातील सर्वाधिक वर्दळ असलेले ठिकाणी असतांनाही याच रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानात भरदिवसा चोरी घडली आहे. ही चोरी साधारन नसून चोरट्यांनी या ज्वेलर्सच्या दुकानाच्या मागील बाजूने दुकानात प्रवेश केला. त्या वेळेच दुकान दुपारच्या जेवणासाठी बंद ठेण्यात आले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करित दुकानातील सोन्यांच्या दागिन्यावर हात साफ केला.
अवघ्या काही निमिटात या चोरट्यांनी दुकानातील साधारण 8 ते 10 किलो सोने लंपास केले आहे. दुकानदार सांध्याकळी पुन्हा दुकान उघडण्यासाठी आल्यावर त्याला या चोरीचा अंदाज आला. त्याने लागलीच पोलीसांकडे या प्रकरणाची तक्रार केली. पोलीसांनी या प्रकारानंतर दुकानातील सीसीटीव्ही, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून चोरटय़ांचा अंदाज घेण्याचे काम सुरू केले आहे. तसेच या प्रकरणात नेमके सोने किती किलो गेले याचे मोजमाप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे व्यापा-यांमध्ये भितीचे वातावरण असून दुपारच्या वेळेच ज्वेलर्सचे दुकान सुरक्षित नसतील तर रात्रीच्यावेळी काय करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे.