२६/११ च्या हल्ल्यातील साक्षीदार हरिशचंद्र श्रीवर्धनकर यांना भाजपाकडून 10 लाखांचा चेक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 04:18 PM2020-05-17T16:18:29+5:302020-05-17T20:19:57+5:30
याप्रसंगी भाजप खासदार कपील पाटील, आमदार गणपत गायकवाड, माजी आमदार नरेंद्र पवार, भाजप नगरसेवक दया गायकवाड, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे आदी उपस्थित होते
कल्याण-26/11च्या दशहतवादी हल्ल्यात दहशतवादी अजमल कसाबच्या खटल्यात प्रमुख साश्रीदार असलेले हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांच्या उपचारासाठी 10 लाख रुपयांचा धनादेश शनिवारी सायंकाळी भाजप आमदार व माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यांच्या घरी जाऊन देण्यात आला. यापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांना मदत देण्याचं आश्वासन दिलं होतं. तसेच, त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली होती.
याप्रसंगी भाजप खासदार कपील पाटील, आमदार गणपत गायकवाड, माजी आमदार नरेंद्र पवार, भाजप नगरसेवक दया गायकवाड, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे आदी उपस्थित होते. कसाबच्या खटल्यात महत्वाची साक्ष देणारे श्रीवर्धनकर हे मुंबईला रस्त्याच्या कडेला एका दुकानदारास आढळून आले. त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांना कल्याणला पाठविले गेले. कल्याणच्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ही बाब कळताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 11 मे रोजी कल्याणच्या खाजगी रुग्णालयात येऊन श्रीवर्धनकर यांची भेट घेतली. त्यांच्या उपचारासाठी लागणारा खर्च भाजपकडून केला जाईल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार काल शनिवारी भाजप आमदार चव्हाण यांच्या हस्ते श्रीवर्धनकर यांचे चिरंजीव मंगेश यांच्या हाती 10 लाख रुपये मदतीचा धनादेश सूपूर्द केला. यावेली मंगेश यांनी भाजपचे आभार मानले.