स्थायी समितीच्या १० सदस्यांचे राजीनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:48 AM2021-09-07T04:48:41+5:302021-09-07T04:48:41+5:30
ठाणे : ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या १० सदस्यांनी सोमवारी राजीनामे दिले. त्यानंतर पीठासीन अधिकारी महापौर नरेश म्हस्के यांनी नवीन ...
ठाणे : ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या १० सदस्यांनी सोमवारी राजीनामे दिले. त्यानंतर पीठासीन अधिकारी महापौर नरेश म्हस्के यांनी नवीन १० सदस्यांची नावे जाहीर केली. त्यानुसार शिवसेनेच्या सहा, भाजपच्या तीन आणि राष्ट्रवादीच्या एका सदस्याचा यात समावेश आहे.
ठाणे महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असल्याने शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि भाजपने त्यानुसार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे स्थायी समितीत इतर नगरसेवकांना संधी देऊन त्यांची भविष्यातील नाराजी दूर करण्याचाच प्रयत्न या माध्यमातून केल्याचे दिसून आले. सोमवारी झालेल्या महासभेत स्थायी समितीत शिवसेनेच्या नरेश म्हस्के, नरेश मणेरा, राम रेपाळे, विमल भोईर, मालती पाटील आणि गुरमुखसिंग स्यान यांच्यासह भाजपचे कृष्णा पाटील, नम्रता कोळी आणि भरत चव्हाण व राष्ट्रवादीचे शानू पठाण यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.
तर त्यांच्या जागी आता शिवसेनेच्या वतीने सुधीर कोकाटे, उमेश पाटील, संतोष वडवले, मिनल संख्ये, अनिता गौरी आणि मधुकर पावशे यांच्यासह भाजपच्या वतीने मिलिंद पाटणकर, सुनेश जोशी आणि अर्चना मणेरा तर राष्ट्रवादीकडून सुहास देसाई यांना संधी देण्यात आली आहे.