भातसाची दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत ठाण्यात १० टक्के पाणीकपात; शासनाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 12:03 PM2022-03-09T12:03:03+5:302022-03-09T12:03:12+5:30

ठाणे : काही दिवसांपासून सुरू असलेल्या ५० टक्के पाणीकपातीमुळे घोडबंदर, वर्तकनगरसह इतर भागात रटॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. परंतु, आता ...

10% water loss in Thane till repair of Bhatasa Dam; Government decision | भातसाची दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत ठाण्यात १० टक्के पाणीकपात; शासनाचा निर्णय

भातसाची दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत ठाण्यात १० टक्के पाणीकपात; शासनाचा निर्णय

Next

ठाणे : काही दिवसांपासून सुरू असलेल्या ५० टक्के पाणीकपातीमुळे घोडबंदर, वर्तकनगरसह इतर भागात रटॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. परंतु, आता जलसंपदा विभागाने ही टंचाई दूर करण्यासाठी भातसा धरणाच्या दुसऱ्या दरवाजातून कालव्यात पाणी सोडले आहे. मात्र, भातसाची पूर्ण दुरुस्ती होईपर्यंत आता पुढील काही दिवस ठाणेकरांना अवघ्या १० टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे आता महापालिकेने पाण्याचे विभागवार केलेले नियोजन देखील रद्द करून पूर्वीप्रमाणेच पाणीपुरवठ्यास सुरुवात केली आहे.

भातसा धरणाच्या दरवाजामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे शहराला ५० टक्के कमी पाणीपुरवठा होत आहे. महापालिका हद्दीत रोज ४८५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. त्यापैकी २०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून करण्यात येतो. त्यासाठी महापालिका भातसा धरणाच्या पिसे बंधाऱ्यातून पाणी उचलते. मात्र, भातसाच्या दरवाजामध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने महापालिकेच्या योजनेतून शहराला ५० टक्के कमी पाणी मिळत आहे. दररोज दोनशेऐवजी शंभर दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होत असल्यामुळे ठाणेकरांचे मागील आठवडाभरापासून हाल सुरू आहेत.

शहरातील घोडबंदर, वर्तकनगर भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. तर काही भागात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. परंतु, टॅंकरचे भावही या काळात काहीसे वधारल्याचे आहेत. हीच बाब लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने भातसा धरणाच्या बिघडलेल्या दरवाजाची दुरुस्ती होईपर्यंत पर्यायी दुसऱ्या दरवाजातून कालव्यात पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पिसे बंधाऱ्यातून दररोज ९० टक्के म्हणजेच १८० दशलक्ष लिटर इतके पाणी उचलणे शक्य होत आहे. दरम्यान, दरवाजा दुरुस्तीचे कामही युद्धपातळीवर सुरू असून ते काम होताच पालिकेला पूर्वीप्रमाणोच २०० दशलक्ष लिटर इतके पाणी उपलब्ध होईल, अशी माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली.

Read in English

Web Title: 10% water loss in Thane till repair of Bhatasa Dam; Government decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.