मनसेतर्फे गणेशोत्सवात कोकणवासीयांकरिता १०० बसगाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:25 AM2021-07-12T04:25:22+5:302021-07-12T04:25:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मनसे कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन कोकणवासीयांना मदतीचा हात देणार आहे. गणेशोत्सवनिमित्त ठाणे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मनसे कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन कोकणवासीयांना मदतीचा हात देणार आहे. गणेशोत्सवनिमित्त ठाणे शहरातील कोकणवासीयांसाठी मनसे १०० मोफत बसगाड्या सोडणार आहे.
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी ठाणे शहरातील चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये म्हणून गेल्यावर्षी मनसेने कोकणात ६४ बसगाड्या सोडल्या होत्या. यावर्षी चाकरमान्यांची कोकणाकडे लागलेली ओढ पाहता ठाणे ते सावंतवाडी यादरम्यान ७ सप्टेंबरपासून पुढील चार दिवस कोकणात १०० बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. या कोकणवासीयांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या बससेवेचा प्रारंभ ठाणे महापालिकेच्या येथून रात्री ८.३० वाजता होणार आहे. एका बसमध्ये ५० प्रवाशांना बसता येणार आहे. मनसे मध्यवर्ती कार्यालयातून १० ऑगस्टपासून बुकिंगसाठी अर्ज दिले जाणार आहेत. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या अधिक आहे. प्रत्येकाला रेल्वेचे आरक्षण मिळत नाही आणि त्यांना खासगी गाडी करून जाणे या कोरोनाकाळात परवडणारे नाही. यासाठी यंदादेखील बसगाड्या सोडण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.
...........
वाचली