मोकळ्या जागांवरील कर थकबाकी १०० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 01:15 AM2020-12-19T01:15:19+5:302020-12-19T01:15:28+5:30

मीरा-भाईंदर पालिका : बिल्डरांकडून वसूल करण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ

100 crore tax arrears on vacant lands | मोकळ्या जागांवरील कर थकबाकी १०० कोटी

मोकळ्या जागांवरील कर थकबाकी १०० कोटी

Next

मीरा राेड : सर्वसामान्य नागरिकांना कोरोनाच्या काळात मालमत्ता करात ५० टक्के सवलत न देणाऱ्या मीरा-भाईंदर महापालिकेने मोकळ्या जागांवरील करापोटी असलेली तब्बल १०० कोटींपेक्षा जास्तीची थकबाकी मात्र बिल्डरांकडून वसूल करण्यास टोलवाटोलवी चालवली आहे .
मीरा-भाईंदर महापालिकेने उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून मोकळ्या जागांवर कर आकारणी सुरू केली. या जागांवरील कर आकारणीची २०२०-२०२१ची एकूण मागणी विचारात घेतली तर थकबाकीची रक्कम तब्बल १०० कोटी १६ लाख ५५ हजारांवर गेली आहे. यापैकी मागील थकीत मागणी ७१ कोटी ७० लाख ७ हजार २९० तर चालू वर्षातील मागणी २८ कोटी ४६ लाख ४८ हजार २९८ इतकी आहे. 
१०० कोटींच्या थकबाकीपैकी न्यायालयीन व इतर कारणांसाठी आलेली स्थगितीची एकूण रक्कम आठ कोटी ९० लाख ९९ हजार ३७५ इतकी आहे. त्यातील ७ कोटी ५२ लाख ३६ हजार ९६९ ही मागील तर चालू वर्षातील स्थगितीची रक्कम १ कोटी ३८ लाख ६२ हजार ४०६ इतकी आहे.
मालमत्ता कर आकारणी किंवा भोगवटा दाखला दिनांकापर्यंत केलेल्या मोकळ्या जागेची कर आकारणी, परंतु भरणा न केलेली रक्कम ७ कोटी १३ लाख ३० हजार ६५३ इतकी आहे. त्यात मागील थकबाकी ६ कोटी ३७ लाख ३६ हजार ८५८ तर चालू वर्षातील थकबाकी ७५ लाख ९३ हजार ७९५ इतकी आहे. व्याजाची रक्कमही २४ कोटी ७६ लाख ३९ हजार इतकी झाली आहे. त्यातही मागील थकीत १५ कोटी ७२ लाख ८ हजार २७१ तर चालू वर्षातील व्याजाची रक्कम ९ कोटी ४ लाख ३० हजार ७४९ इतकी आहे.

५ कोटी ९८ लाखांची केली वसुली
न्यायालयीन व वादातील प्रकरणे तसेच मालमत्ता कर व भोगवटा दाखला दिलेल्या थकीत रकमेला वगळून एकूण थकबाकीची रक्कम ५३ कोटी ३७ लाख ८४ हजार ६५० रुपये इतकी असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मोकळ्या जागेवरील निव्वळ मागणी ही ५९ कोटी ३५ लाख ८६ हजार ५४० रुपये असून, त्यात मागील थकबाकी ४२ कोटी ८ लाख २५ हजार १९२ तर चालू वर्षाची रक्कम १७ कोटी २७ लाख ६१ हजार ३४८ रुपये इतकी आहे. पालिकेने चालू आर्थिक वर्षात एकूण ५ कोटी ९८ लाख १ हजार ८९० रुपये इतकी मोकळ्या जागांची कर वसुली केलेली आहे. त्यातील २ कोटी ४१ लाख ३८ हजार ३११ ही मागील थकबाकीपैकी तर ३ कोटी ५६ लाख ६३ हजार ५७९ चालू कराची आहे.

Web Title: 100 crore tax arrears on vacant lands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.