पॉज संस्थेने केले १०० लीटर दूध संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:13 AM2021-03-13T05:13:14+5:302021-03-13T05:13:14+5:30

डोंबिवली : पॉज या संस्थेतर्फे दरवर्षी महाशिवरात्रीला शंकराच्या पिंडीवर टाकले जाणारे दूध संकलित केले जाते. यंदाही उपक्रमाला नागरिकांनी प्रतिसाद ...

100 liters of milk collected by Pause organization | पॉज संस्थेने केले १०० लीटर दूध संकलन

पॉज संस्थेने केले १०० लीटर दूध संकलन

Next

डोंबिवली : पॉज या संस्थेतर्फे दरवर्षी महाशिवरात्रीला शंकराच्या पिंडीवर टाकले जाणारे दूध संकलित केले जाते. यंदाही उपक्रमाला नागरिकांनी प्रतिसाद दिला असून शिवमंदिर बंद असतानाही १०० लीटर दूध संकलित करून संस्थेने ते प्राण्यांना तसेच अनाथाश्रमात दिले.

संस्थेचे निलेश भणगे यांनी सांगितले की, भाविक दूध पिंडीवर अभिषेकासाठी घेऊन येतात. ते सर्व दूध शेवटी नाल्यात सोडले जाते. असे दूध वाया न जाऊ देता ते सर्व दूध गोळा करून, उकळून, पाणी मिक्स करून आणि फिल्टर करून पॉज संस्था रस्त्यावरील जखमी प्राण्यांना देते. तसेच न फोडलेल्या दुधाच्या पिशव्या या वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमात दिले जाते. कार्यकर्ते अभिषेक सिंग, साधना सभरवाल, उनिशिया वाझ, पवन भोईटे आणि ग्लेन अलमेडा यांनी सकाळी भाविकांशी संवाद साधून त्यांना विनंती करून दूध चमचाभर अर्पण करून बाकीचे संस्थेला देण्यास सांगितले. या अभिनव आणि अनोख्या उपक्रमास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अवघ्या काही तासांत शेकडो लीटर दूध जमा झाले. लगेच त्याचे वितरण करून ठिकठिकाणी प्राण्यांसाठी वाटप करण्यात आल्याचे ते म्हणाले.

------

फोटो आहे

Web Title: 100 liters of milk collected by Pause organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.