१३१ शाळांचे १०० टक्के निकाल, ठाणे जिल्ह्यातील चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 01:22 AM2019-06-09T01:22:44+5:302019-06-09T01:22:53+5:30
गेल्या वर्षी २६९ शाळा ठरल्या होत्या शंभर नंबरी
ठाणे : यंदा जिल्ह्याचा निकाल घसरल्याने १०० टक्के निकाल लागणाऱ्या शाळांमध्येही घट झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील पाच तालुके व सहा महापालिकेतील सुमारे १३१ शाळांचा १०० टक्के निकाल लागला. गेल्यावर्षी २६९ शाळा शंभर नंबरी होत्या.
शंभर नंबरी निकाल लागलेल्या १३१ शाळांमध्ये कल्याण-डोंबिवली भागातील सर्वाधिक ४० शाळांचा समावेश आहे. यामध्ये डोंबिवलीतील चंद्रकात पाटकर विद्यालय, विद्यानिकेतन हायस्कूल, डॉन बॉस्को स्कूल, कल्याणातील गजानन विद्यालय, महावीर जैन इंग्लिश स्कूल, बालकमंदिर संस्था (इंग्रजी माध्यम), वाणी विद्यालय, के.सी. गांधी विद्यालय आदी शाळांचा समावेश आहे.
त्यापाठोपाठ ठाणे महापालिका क्षेत्रातील २७ शाळांनी शंभर नंबरी यश प्राप्त केले असून त्यात ठाण्यातील संकल्प इंग्लिश स्कूल, होली क्र ॉस, सरस्वती एज्युकेशन हायस्कूल पाचपाखाडी, एन.के.टी. हायस्कूल, शिवनिकेतन यासारख्या शाळांचा, तर मीरा-भार्इंदर येथील ७, नवी मुंबईतील २० शाळांचा समावेश आहे. अपेक्षेपेक्षा कमी निकाल लागल्याची खंत अनेक शाळांनी व्यक्त केली.
सरस्वती सेकंडरी स्कूलच्या ओमकारला ९७.६० टक्के
सरस्वती सेकंडरी स्कूलचा निकाल ९७.८० टक्के लागला असून यात ओमकार नित्सुरे याने ९७.६० टक्के गुण मिळवून तो शाळेत प्रथम आला आहे. डॉ. बेडेकर विद्यामंदिरचा निकाल ९७.२० टक्के लागला असून यात रुद्र जेवळीकर या विद्यार्थ्याने ९४.२० टक्के मिळवून तो शाळेत प्रथम आला आहे. ग्रामीण विभागातील विद्या प्रसारक संस्थेचे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, ठाणे यांचा दहावीचा निकाल ९५.१९ टक्के लागला. यात आकांक्षा भोईर हिने प्रथम, प्रियंका पवार द्वितीय, हर्ष पाटील तृतीय तर प्रणय पानसरेने चतुर्थ क्रमांक पटकावला.संकल्प इंग्लिश स्कूलचा सलग आठव्या वर्षी १०० टक्के निकाल लागला असून यात स्नेहल वेलोंडे या विद्यार्थिनीने ९०.४० टक्के गुण संपादन केले आहे. संकेत विद्यालयाचा निकाल ८९.३४ टक्के लागला. यात ऋषिकेश नाफडे ९१.८० टक्के मिळवून प्रथम, विवेक चौधरी ९०.६० टक्के मिळवून द्वितीय, नयन गायकवाड ९० टक्के मिळवून तृतीय आला. मोरेकर गणित अभ्यासिकेचा निकाल १०० टक्के पूर्व चेंदणी कोळीवाड्यातील हरेश्वर मोरेकर विनाशुल्क गणित अभ्यासिकेचा निकाल यंदाच्या ५४ व्या वर्षीही १०० टक्के लागला. यावर्षी १० विद्यार्थ्यांनी या अभ्यासिकेचा लाभ घेतला.