उल्हासनगरातील १०० क्षयरोग रुग्ण संच्युरी कंपनीकडून ६ महिन्यांसाठी दत्तक
By सदानंद नाईक | Published: May 16, 2024 05:23 PM2024-05-16T17:23:56+5:302024-05-16T17:25:10+5:30
जगातील प्रमुख १० रोगामध्ये क्षयरोगाचा समावेश असून क्षयरुग्णांना उपचार कालावधीत पोषक आहार मिळाल्यास त्यांचे बरे होण्याचे प्रमाण वाढते.
उल्हासनगर : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत महापालिकेकडून दरवर्षी टी वी रुग्णांची शोधमोहिम राबिवली जात असून वर्षाला १५०० टी.बी. रुग्ण शहरात आढळतात. त्यापैकी १०० रुग्णांना सहा महिन्यांसाठीं ग्रासीम कंपनी संच्युरी यांनी ६ महिण्यासाठी दत्तक घेतल्याची माहिती उपायुक्त डॉ सुभाष जाधव यांनी दिली आहे.
जगातील प्रमुख १० रोगामध्ये क्षयरोगाचा समावेश असून क्षयरुग्णांना उपचार कालावधीत पोषक आहार मिळाल्यास त्यांचे बरे होण्याचे प्रमाण वाढते. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. केंद शासनाने क्षयरुग्णांना प्रति व्यक्ती, प्रति महिना आवश्यक धान्य, कडधान्य, डाळी, तेल इत्यादी पोषण आहार निक्षयमित्राच्या माध्यमातून देण्याचे प्रयोजन आहे. सहा महिन्याचा पोषण आहारामुळे क्षयरुग्णांच्या आजारात व तब्येतीत झपाटयाने सुधारणा होत आहे. उल्हासनगर महापालिका यांच्या मार्गदर्शनामुळे दानशूर ग्रासिम कंपनी संच्युरी रेयॉन यांच्या सीएसआर निधीतून १०० क्षयरुग्णांना सहा महिन्यासाठी दत्तक घेऊन पोषण आहारासाठी निक्षयमित्र बनून ३ लाख ९० हजार रुपयांचा धनादेश महापालिका आयुक्त अजीज शेख यांना कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहुल ललका यांनी दिला आहे.
महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी क्षयरोग रुग्णांना अशा पध्दतीने निक्षयमित्र म्हणून इतर दानशूर सामाजिक संस्था, स्वयं सेवी संस्था, लोक प्रतिनिधी किंवा कॉपोरेट संस्था यांनी सहकार्य करावे. असे आवाहन केले आहे. यावेळी उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, वैधकीय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा आदीजन उपस्थित होते.