जिल्ह्यातील रात्र शाळेचा दहावीचा निकाल ६७.२० टक्के
By प्रज्ञा म्हात्रे | Published: May 27, 2024 04:32 PM2024-05-27T16:32:20+5:302024-05-27T16:33:16+5:30
कल्याण येथील राजहंस रात्र शाळेने आघाडी घेतली असून या शाळेचा निकाल ९३.७५ टक्के इतका लागला आहे.
ठाणे : नियमीत शाळांबरोबर जिल्ह्यातील सात रात्र शाळेचा निकाल देखील सोमवारी लागला असून हा निकाल ६७.२० टक्के इतका लागला आहे. यात कल्याण येथील राजहंस रात्र शाळेने आघाडी घेतली असून या शाळेचा निकाल ९३.७५ टक्के इतका लागला आहे.
जिल्ह्यात भारत रात्र शाळा, ठाणे, कळवा रात्र शाळा, कळवा, राजहंस रात्र शाळा, कल्याण, आर. के. हिंदी रात्र शाळा, कल्याण, सिद्धार्थ रात्र शाळा, कल्याण, उन्नती रात्र शाळा, डोंबिवली, राधारमण रात्र शाळा, नवी मुंबई अशा सात शाळा असून या सातही शाळांचा एकूण निकाल ६७.२० टक्के इतका लागला आहे. यातील सहा शाळा या अनुदानित तर राधारमण रात्र शाळा ही अंशत: अनुदानित आहेत. या शाळांमधील १२८ विद्यारर्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परिक्षेसाठी नोंदणी केली होती. पैकी १२५ विद्यार्थी हे परिक्षेला बसले होते. त्यापैकी ८४ विद्यार्थी हे उत्तीर्ण झाल्याचे निकालावरुन स्पष्ट होत आहे. यातील तीन विद्यार्थ्यांना डिस्टींक्शन, १५ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, २९ विद्यार्थ्यांना दिव्तीय तर ३७ विद्यार्थी पास क्लास झाले आहेत. डिस्टींक्शन मिळविणारे हे तीनही विद्यार्थी कल्याण येथील राजहंस रात्र शाळेचे आहेत. १२५ पैकी ८४ विद्यार्थी या शाळेत उत्तीर्ण झाले असले तरी ४१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचे निकालावरुन दिसून येत आहे.
सात शाळांचा निकाल खालीलप्रमाणे
शाळांची नावे निकाल
भारत रात्र शाळा, ठाणे - ७६.४७ टक्के
कळवा रात्र शाळा, कळवा - ६९.२३ टक्के
राजहंस रात्र शाळा, कल्याण - ९३.७५ टक्के
आर. के. हिंदी रात्र शाळा, कल्याण - ४७.०५ टक्के
सिद्धार्थ रात्र शाळा, कल्याण - ५७.१४ टक्के
उन्नती रात्र शाळा, डोंबिवली - ३० टक्के
राधारमण रात्र शाळा, नवी मुंबई - ७३.६८ टक्के