आश्रमशाळेत दहावीची मुलगी गर्भवती; रक्तस्त्राव सुरू झाल्यामुळे प्रकार उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 03:06 PM2021-03-12T15:06:16+5:302021-03-12T15:06:45+5:30
गुरुवारी तिला नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात असून, तेथे तिची पुन्हा वैद्यकीय चाचणी करण्यात आली
हुसेन मेमन
जव्हार - आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत येणाऱ्या शासकीय कन्या आश्रमशाळा साकुर येथील इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेली मुलगी दोन महिन्यांची गरोदर असल्याचे वैद्यकीय तपासात निष्पन्न झाल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे.
जव्हार तालुक्यातील 8 किमी अंतरावर असलेल्या शासकीय कन्या आश्रमशाळेतील बुधवारी एका मुलीला शाळेत असताना रक्तस्राव व उलट्या होऊ लागल्या, त्यामुळे तिला प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र साकुर येथे शाळेतील महिला अधिक्षिका यांनी उपचारासाठी दाखल केले, तिथे तिची गर्भ चाचणी करण्यात आली, तिथेच ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. पुढील उपचारासाठी तिला जव्हारच्या कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिच्यावर उपचार सुरू असताना, तिला पुन्हा खूप रक्तस्राव सुरू झाले, त्यामुळे तिची प्रकृती खालावत होती, म्हणून गुरुवारी तिला नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात असून, तेथे तिची पुन्हा वैद्यकीय चाचणी करण्यात आली, त्यात ती दोन महिन्याची गर्भवती असल्याचे धक्कादायक प्रकार उघड झाले आहे. तिच्यावर पूढील उपचार सुरू आहेत. तिच्या सोबत शाळेतील महिला अधीक्षक व मुलीचे पालक सोबत आहेत.
शासकीय आश्रमशाळा साकुर, ही पाहिले ते बारावी पर्यंत निवासी कन्या शाळा आहे, येथे नववी ते बारावीचे वर्ग सुरू असून, वसतिगृहात 156 विद्यार्थी पट संख्या आहे, तर शाळेत 115 विध्यार्थी उपस्थितीत आहेत, ही मुलगी 7 फेब्रुवारी रोजी पासून शाळेत उपस्थित आहे, तिच्या पालकांनी याबाबत गावीतल एका मुलासोबत तिचे प्रेमसंबंध होते, लॉकडाऊन काळात हा प्रकार घडल्याचे पालकांनी कबूल केले असल्याची माहिती साकुर आश्रमशाळेचे प्रभारी मुख्याध्यापक डी. डी. भुसारा यांनी सांगितले.