भीषण आगीत खासगी बँकेचे ११ एसी जळून खाक; सुदैवाने कुणालाही दुखापत नाही

By कुमार बडदे | Published: December 2, 2024 10:53 AM2024-12-02T10:53:23+5:302024-12-02T10:53:49+5:30

जवानांनी एक फायर आणि एक रेस्क्यू वाहनाच्या मदतीने अथक प्रयत्नानी आग विझवली. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही

11 ACs of private bank burnt down in fire at Thane; Fortunately, no one was hurt | भीषण आगीत खासगी बँकेचे ११ एसी जळून खाक; सुदैवाने कुणालाही दुखापत नाही

भीषण आगीत खासगी बँकेचे ११ एसी जळून खाक; सुदैवाने कुणालाही दुखापत नाही

मुंब्राः  बँकेच्या वातानाकुलित (एसी) यंत्राना लागलेल्या भीषण आगीत ११ आऊटडोअर युनिट पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना सोमवारी सकाळी मुंब्र्यात घडली.

ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा शहरातील कौसा भागातील नशेमन गृहसंकुलाच्या तळ आणि पहिल्या मजल्यावर एका खाजगी बँकेची शाखा आहे.या बँकेच्या तळ मजल्यावरील एसी युनिटला सोमवारी सकाळी पावणेसात वाजता भीषण आग लागली.याबाबतची माहिती मिळताच वीज वितरण करणाऱ्या खाजगी कंपनीचे कर्मचारी आणि मुंब्रा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

जवानांनी एक फायर आणि एक रेस्क्यू वाहनाच्या मदतीने अथक प्रयत्नानी आग विझवली. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. परंतु बँकेचे ११ एसी आऊडडोअर युनिट पूर्णपणे जळून खाक झाले.आगीची झळ  बँकेच्या जवळ असलेल्या मोबाईल आणि  कपड्याच्या दुकानांना देखील बसली.यात दुकानांचे  किरकोळ नुकसान झाले असल्याची माहिती ठामपाच्या आप्तकालिन कक्षातील अधिका-यांनी दिली.

Web Title: 11 ACs of private bank burnt down in fire at Thane; Fortunately, no one was hurt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग