११ व्यापाऱ्यांची फसवणूक: पुण्यातील दोघांनी घातला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 05:11 AM2019-03-31T05:11:47+5:302019-03-31T05:12:09+5:30
६५ लाखांची कापडखरेदी : पुण्यातील दोघांनी घातला गंडा
उल्हासनगर : शहरातील तब्बल ११ व्यापाऱ्यांकडून ६४ लाख ८६ हजारांचे कपडे खरेदी करून फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात दोन व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पुणे येथील सुजय शर्मा व कमलेश जैन यांनी संगनमत करून विनायक टेक्सटाइल कंपनीचे मालक भासवून शहरातील व्यापाºयांचा विश्वास संपादन केला. नोव्हेंबर २०१८ मध्ये कृष्णा फॅन्सी शर्ट्स दुकानातून पाच लाख ४३ हजार, सुहास एंटरप्रायझेसकडून तीन लाख ७१ हजार, सोनी कलेक्शन दुकानाकडून दोन लाख ८७ हजार, जय साई गारमेंट दुकानातून एक लाख ९१ हजार, बालाजी एंटरप्रायझेसकडून तीन लाख ९१ हजार, कुमार क्रिएशनकडून दोन लाख ६६ हजार, लक्ष्मी क्रिएशनकडून १० लाख ६८ हजार, रिद्धिसिद्धी गारमेंट दुकानाकडून एक लाख ७८ हजार, गॉड गिफट क्रिएशनकडून १२ लाख ८८ हजार, महेश जयराज टेडर्सकडून ११ लाख ५५ हजार व एएम जीन्स दुकानाकडून आठ लाख २१ हजार असे एकूण ६४ लाख ८६ हजारांचे कपडे खरेदी करून धनादेशाने बिल दिले.
शहरातील व्यापाºयांनी बँकेत धनादेश वठवण्यासाठी टाकल्यावर खाते बंद केल्याचे उघड झाले. तसेच शर्मा व जैन यांनी दिलेल्या पत्त्यावरील दुकान बंद असून त्यांचा मोबाइल बंद होता.
आपली फसवणूक झाल्याचे व्यापाºयांच्या लक्षात आल्यावर त्यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. व्यापाºयांपैकी दीपक बिजलानी यांनी जैन व शर्मा या दोघांनी ११ व्यापाºयांची फसवणूक केल्याची तक्रार उल्हासनगर पोलीस ठाण्यात केली.
तक्रारीवरून पोलिसांनी जैन व शर्मा यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. फसवणूक झालेल्या व्यापाºयांची संख्या मोठी असल्याचे संकेत पोलिसांनी दिले. त्यांना धीर दिल्यास ते व्यापारीही तक्रार करण्यासाठी पुढे येतील, असा विश्वास पोलिसांनी यावेळी व्यक्त केला.
जैन व शर्माचा शोध सुरू
उल्हासनगरातील एकूण ११ व्यापाºयांना ६५ लाखांना फसवल्याचे उघड झाले. याप्रकरणी जैन व शर्मा नावाच्या व्यापाºयांचा शोध उल्हासनगर पोलीस घेत आहेत. उल्हासनगरासह अन्य शहरांतील व्यापाºयांचीही फसवणूक केली असेल, असा पोलिसांचा अंदाज आहे.