ठाणे जिल्ह्यातील ११ ग्रा. पं.च्या मुदत पूर्व निवडणुकीसाठी आरक्षण सोडत सुरू!
By सुरेश लोखंडे | Published: February 10, 2024 07:00 PM2024-02-10T19:00:10+5:302024-02-10T19:00:15+5:30
४३१ ग्राम पंचायतींकडून ग्रामीण, दुर्गम भागातील गांवखेड्यांचा कारभार पाहिला जात आहे.
ठाणे: जिल्ह्यात ४३१ ग्राम पंचायतींकडून ग्रामीण, दुर्गम भागातील गांवखेड्यांचा कारभार पाहिला जात आहे. त्यापैकी यंदा ११ ग्राम पंचायतींच्या सरपंच, उपसरपंच आणि सदस्यंचा कार्यकाळ संपणार आहे. तेथे मुदत पूर्व निवडणुका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यास अनुसरून प्रभाग रचना आधीच झाली असता आता आरक्षण सोडत काढण्याचे काम जिल्ह्यातील संबंधीत तालुक्यांमध्ये सुरू करण्यात आलेले आहे.
जिल्ह्यातील या ग्राम पंचायतींचीा जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपत आहे. त्यांच्या या निवडणुकीचा कार्यक्रम हाती घेण्यास अनुसरून तेथे आधीच प्रभाग रचना निश्चित करण्यात आलेल्या असून आता संबंधीत उपविभागीय अधिाकारी आणि तहसीलदार यांच्या नियंत्रणात आरक्षण सोडत काढण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम कल्याण, भिवंडी, शहापूर, आणि मुरबाड तालुक्यातील या ११ ग्राम पंचायतींच्या निवडणुकीची ही पूर्व तयारी सुरू करण्यात आलेली आहे.
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये कल्याणमधील चवरे-म्हसरुंडी, दहागाव, रोहण-अंताडे, पोई या ग्राम पंचायतींचा समावेश आहे. तर भिवंडीमधील महापोली, अनगाव ग्राम पंचायती आहे. शहापूरच्या साकुली, सावरोली बुद्रक ग्रा.पं. आहेत. याप्रमाणेच मुरबाड तालुक्यातीलझाडघर, न्याहाडी, दहिगाव ग्राम पंचायतींसाठी सध्या आरक्षण सोडतचा कार्यक्रम जारी करण्यात आलेला आहे.
प्रभाग निहाय आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाचे नियोजन
आदेश जारी झाल्याप्रमाणे विशेष ग्राम सभेची सुचना ७ फेब्रुवारीपर्यंत देण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर ९ फेब्रुवारीपर्यंत आरक्षण सोडत काढण्याची कारवाई पूर्ण झाली आहे. तर या आरक्षण सोडतच्या प्रारूप अधिसुचनेला ठाणे जिल्हाधिकारी १२ जानेवारीपर्यंत मान्यता देणार आहे. यानंतर १३ फेब्रुवारीला प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद होईल. त्यावर हरकती व सुचाना १६ फेब्रुवारीपर्यंत घेतल्या जात आहे. त्यावर उपविभागीय अधिकारी यांनी २१ फेब्रुवारीपर्यंत अभिप्राय देऊन त्यास जिल्हाधिकारी यांनी २३ फेब्रुवारीपपर्यंत मान्यता देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.