ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या ११ सदस्यांचे राजीनामे; नव्या सदस्यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 02:03 PM2021-09-06T14:03:16+5:302021-09-06T14:03:33+5:30

ठाणे  महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असल्याने शिवसेनेसह, राष्ट्रवादी आणि भाजपने त्यानुसार मोर्चे बांधणी सुरु केली आहे.

11 members of Thane Municipal Corporation Standing Committee resign; Appointment of new members | ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या ११ सदस्यांचे राजीनामे; नव्या सदस्यांची नियुक्ती

ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या ११ सदस्यांचे राजीनामे; नव्या सदस्यांची नियुक्ती

Next

ठाणे : ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या ११ सदस्यांनी सोमवारी राजीनामे दिले. त्यानंतर पिठासीन अधिकारी महापौर नरेश म्हस्के यांनी नवीन ११ सदस्यांची नावे जाहीर केली. त्यानुसार यामध्ये शिवसेनेच्या सहा, भाजपच्या तीन आणि राष्ट्रवादीच्या एका सदस्याचा यात समावेश आहे.

ठाणे  महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असल्याने शिवसेनेसह, राष्ट्रवादी आणि भाजपने त्यानुसार मोर्चे बांधणी सुरु केली आहे. त्यामुळे स्थायी समितीत इतर नगरसेवकांना संधी देत त्यांची भविष्यातील नाराजी दूर करण्याचाच प्रयत्न या माध्यमातून केल्याचे दिसून आले. 

सोमवारी झालेल्या महासभेत स्थायी समितीच्या शिवसेनेच्या नरेश म्हस्के, नरेश मणेरा, राम रेपाळे, विमल भोईर, मालती पाटील आणि गुरमुखसिंग स्यान यांच्यासह भाजपचे कृष्णा पाटील, नम्रता कोळी आणि भरत चव्हाण व राष्ट्रवादीचे शाणु पठाण यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. तर त्यांच्या जागी आता शिवसेनेच्या वतीने सुधीर कोकाटे, उमेश पाटील, संतोष वडवले, मिनल संख्ये, अनिता गौरी आणि मधुकर पावशे यांच्यासह भाजपच्या वतीने मिलिंद पाटणकर, सुनेश जोशी आणि अर्चना मणोरा तर राष्ट्रवादीकडून सुहास देसाई यांना स्थायी समितीमध्ये संधी देण्यात आली आहे.

Web Title: 11 members of Thane Municipal Corporation Standing Committee resign; Appointment of new members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.