अकरा महिन्यांत घरगुती २४१, तर व्यावसायिक गॅस सिलिंडर ४०० रुपयांनी महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:24 AM2021-07-03T04:24:57+5:302021-07-03T04:24:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : केंद्र सरकारच्या अख्त्यारित असलेला घरगुती गॅस सिलिंडर ११ महिन्यांत २४१ रुपयांनी, तर व्यावसायिक गॅस ...

In 11 months, domestic gas cylinders went up by Rs 241 and commercial gas by Rs 400 | अकरा महिन्यांत घरगुती २४१, तर व्यावसायिक गॅस सिलिंडर ४०० रुपयांनी महागला

अकरा महिन्यांत घरगुती २४१, तर व्यावसायिक गॅस सिलिंडर ४०० रुपयांनी महागला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : केंद्र सरकारच्या अख्त्यारित असलेला घरगुती गॅस सिलिंडर ११ महिन्यांत २४१ रुपयांनी, तर व्यावसायिक गॅस सिलिंडर ४१७ रुपयांनी महाग झाला आहे. काेविडमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले असताना गॅसदरवाढीमुळे वर्षभरात सामान्यांचे कंबरडेच माेडले आहे. त्यामुळे घरचे बजेट सांभाळताना पैशांची जुळवाजुळव करताना गृहिणींना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

डिझेल, पेट्राेलबराेबरच घरगुती गॅसच्या दरवाढीमुळे महागाईचा भडका उडाला आहे. त्यामुळे नाेकरदार, व्यावसायिकांची माेठी अडचण निर्माण झाली आहे. काेराेनामुळे नाेकरदारांना पगारकपातीचा सामना करावा लागत आहे, तर व्यवसायांवरील निर्बंधांमुळे दीड वर्षांपासून हाॅटेल व्यवसाय नावालाच सुरू आहे. सध्या वर्क फ्राॅम हाेम सुरू असल्याने घरातल्या स्वयंपाकाच्या गॅसची मागणी वाढली आहे. मात्र, दरमहिन्याला गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमती पाहून गृहिणींचे डाेळे पांढरे हाेण्याची वेळ आली आहे. खर्चाची आकडेमोड करता करता त्यांची दमछाक हाेऊ लागली आहे. घरचे बजेट आटाेक्यात ठेवण्यासाठी गॅसच्या किमतीवर कुठेतरी नियंत्रण मिळवायलाच हवे, अशी मागणी केली जात आहे.

ऑगस्ट ते डिसेंबर २०२०मधील दर

ऑगस्ट

घरगुती ५९४.५०

व्यावसायिक १०९१.५०

सप्टेंबर २०२०

घरगुती ५९४.५०

व्यावसायिक १०९०.००

ऑक्टोबर :

घरगुती ५९४.५०

व्यावसायिक १११४.५०

नोव्हेंबर :

घरगुती ५९४.५०

व्यावसायिक ११९०.५०

डिसेंबर :

घरगुती ५९४.५०

व्यावसायिक १२४५.५०

डिसेंबर :

घरगुती ६४४.५०

व्यावसायिक १२८१.५०

------------------

जानेवारी ते जुलै २०२१ दरम्यानचे दर

जानेवारी

घरगुती ६९४.५०

व्यावसायिक १२९८.५०

फेब्रुवारी :

घरगुती ६९४.५०

व्यावसायिक १४९४

मार्च :

घरगुती ८१९.५०

व्यावसायिक १५६४.५०

एप्रिल :

घरगुती ८०९.५०

व्यावसायिक १५९१.५०

मे :

घरगुती ८०९.५०

व्यावसायिक १५४६

जून :

घरगुती ८०९.५०

व्यावसायिक १४२३.५०

जुलै :

घरगुती ८३५

व्यावसायिक १५०८

(ही सर्व आकडेवारी डोंबिवलीतील गॅस सिलिंडर वितरक एजन्सीनुसार आहे)

-----------------

घरगुती गॅस सिलिंडच्या किमतींवर नियंत्रण हवेच

केंद्र सरकारने वाढत्या गॅसच्या किमती नियंत्रणात आणायला हव्यात. सबसिडी बंद करायची नाही हे जरी चांगले असले तरी महिन्याला वाढ योग्य नाही. त्याला काहीतरी प्रमाण असावे. या किमती नियंत्रणात आणणे ही केंद्राची जबाबदारी आहे. राज्य शासनाने यासाठी लक्ष घालायला हवेच. केंद्राला पत्र पाठवून मागणी करायला हवी.

- गृहिणी

------------

वर्षभर कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. त्यात घरात आजारपण, कौटुंबिक समस्या आदी आहेतच. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यात सिलिंडर महागला की थेट स्वयंपाक घरात त्याचे पडसाद उमटतात. त्या किमतींवर नियंत्रण हवेच. जीवनावश्यक सर्व वस्तू महाग होत आहेत. वीजबिल, पेट्रोल, गरजू वस्तू, प्रवास, कपड्यांचे भाव, जागांचे भाव सगळे आवाक्याबाहेर जात चालले आहे.

- गृहिणी

Web Title: In 11 months, domestic gas cylinders went up by Rs 241 and commercial gas by Rs 400

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.