डोंबिवलीत ११ रिक्षा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 02:05 AM2017-08-04T02:05:12+5:302017-08-04T02:05:12+5:30
बेकायदा आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया ५७६ रिक्षांची कल्याण आरटीओ आणि डोंबिवली शहर वाहतूक पोलिसांनी गुरुवारी सलग दुस-या दिवशी तपासणी केली.
डोंबिवली : बेकायदा आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया ५७६ रिक्षांची कल्याण आरटीओ आणि डोंबिवली शहर वाहतूक पोलिसांनी गुरुवारी सलग दुस-या दिवशी तपासणी केली. त्यात ४८ दोषी आढळल्या, तर मुदत संपलेल्या ११ रिक्षा जप्त करण्यात आल्या.
डोंबिवलीतील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच, रिक्षाचालकांच्या वाढत्या मुजोरीच्या तक्रारी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडे आल्या आहेत. बेकायदा आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांना चाप लावण्यासाठी बुधवारपासून ही कारवाई शहरात सुरू झाली आहे. गुरुवारी गुप्तता बाळगत दावडी, नांदिवली, गांधीनगर तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवर धडक कारवाई करण्यात आली.
जप्त केलेल्या ११ रिक्षा कल्याणमधील खडकपाडा मैदानात नेल्याची माहिती शहर वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलीस निरीक्षक गोविंद गंभीरे यांनी दिली. ४८ दोषी रिक्षांमध्ये वाहन चालवण्यासंदर्भातील कागदपत्रांची पूर्तता नसणे, रिक्षाचालकांकडे लायसन्स व बॅज नसणे आदी कारणांचा समावेश होता. या मोहीमेमुळे शहरातील रिक्षाचालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.