काशिमीरा भागात महसूल बुडवून चालणारी चोरटी वाळू तस्करी उघड, ११ ट्रक जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 05:11 PM2018-05-24T17:11:26+5:302018-05-24T17:11:26+5:30

मीरा भाईंदर परिसरातून शासनाची रॉयल्टी बुडवून पहाटेच्या वेळी वाळूची चोरटी वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघड झाले आहे.  वाळूने भरलेले ११ ट्रक जप्त करून त्यांच्या चालकांना अटक करण्यात आली आहे . 

11 trucks seized from Kashimira area | काशिमीरा भागात महसूल बुडवून चालणारी चोरटी वाळू तस्करी उघड, ११ ट्रक जप्त

काशिमीरा भागात महसूल बुडवून चालणारी चोरटी वाळू तस्करी उघड, ११ ट्रक जप्त

googlenewsNext

मीरारोड - मीरा भाईंदर परिसरातून शासनाची रॉयल्टी बुडवून पहाटेच्या वेळी वाळूची चोरटी वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघड झाले आहे.  वाळूने भरलेले ११ ट्रक जप्त करून त्यांच्या चालकांना अटक करण्यात आली आहे . 

सूर्यास्ता नंतर वाळू , दगड , माती आदी गौण खनिज यांची वाहतूक करता येत नाही . परंतु मीरा भाईंदर मध्ये रात्री व पहाटे पर्यंत सर्रास या गौणखनिजाची बेकायदा वाहतूक केली जाते . या मध्ये चालका कडे आवश्यक कागदपत्रे , परवाना, रॉयल्टी नसल्याचे प्रकार सतत उघड झाले आहेत . रॉयल्टी ची पावती असली तरी ती मुदतबाह्य किंवा मुद्दाम अपूर्ण भरलेली असते . 

वाळू उत्खनन सुरु झाले असले तरी पुन्हा शासनाचा महसूल बुडवून चोरटी वाळू वाहतूक सर्रास केली जाते . या विरोधात पोलीस अधीक्षक डॉ . महेश पाटील यांनी देखील कारवाईचे निर्देश पोलिसांना दिले होते . अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अधीक्षक अतुल कुलकर्णी, सहाय्य्क निरीक्षक नवनाथ लहांगे सह जाधव , हद्गल , साळुंखे , पाटील यांनी घोडबंदर येथे पहाटेच्या वेळेस सापळा रचला .  

तसेच तेथून जाणाऱ्या वाळू आदी गौणखनिज वाहून नेणाऱ्या वाहनांचा पाठलाग करण्यासाठी पथकं तैनात केली . दहिसर चेकनाका येथे पोलिसांनी ११ वाळूने भरलेले ट्रक पकडले . या आकरा पैकी एकाही कडे रॉयल्टी नव्हती . पोलिसांनी सर्व ११ ट्रक जप्त करत ११ चालकांना ताब्यात घेतले . महसूल विभागाला याची सूचना दिल्या नंतर तलाठी अभिजित बोडके यांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली . 

पोलिसांनी ११ ट्रकचे चालक व मालक यांच्यावर गुन्हा दाखल केला असून ११ ट्रकची किंमत सुमारे ५५ लाख तर सव्वा दोन लाख रुपयांची वाळू जप्त करण्यात आली आहे . घोडबंदरच्या रेती बंदर भागातून हि वाळू तस्करी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले . अश्विनी जोशी ह्या जिल्हाधिकारी असताना त्यांनी येथे धडक कारवाई करून करेन आदी तोडून टाकल्या होत्या . 

Web Title: 11 trucks seized from Kashimira area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.