डोंबिवलीत ११० बेशिस्त वाहनचालकांकडून २० हजारांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 11:52 AM2018-10-25T11:52:57+5:302018-10-25T11:53:34+5:30

६२ रिक्षा, ४२ दुचाकी, ३ चारचाकी, ३ टेम्पो चालकांना दंड; वाहतूक नियंत्रण विभागाची कारवाई

from 110 byrled drivers recovered 20 thousand rupees in Dombivli | डोंबिवलीत ११० बेशिस्त वाहनचालकांकडून २० हजारांचा दंड वसूल

डोंबिवलीत ११० बेशिस्त वाहनचालकांकडून २० हजारांचा दंड वसूल

Next

डोंबिवली: येथील फडके रोड, इंदिरा गांधी चौक तसेच चिपळूणकर रोड, केळकर रोड आदी रेल्वे स्थानक परिसरात नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणे, नो एंट्रीत घुसणे, बॅज नसणे, गणवेश नसणे आदी ११० बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक नियंत्रण विभागाच्या पोलिस अधिका-यांनी बुधवारी कारवाई केली.त्यांच्याकडून २० हजार रूपयांचा दंड वसुल करण्यात आला.


वाहन चालवतांना लायसन नसणे, उद्धट वर्तन, राँग साईडने वाहन चालवणे असे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक नियंत्रण सपशेल कोलडमते, ती सवय मोडण्यासाठी काटेकोर कारवाई करणे आवश्यक आहे. विशेषत: स्थानक परिसरात अशा बेशिस्व वाहनचालकांमुळे शहराचे नियोजन सपशेल कोलमडते. त्यासाठी फडके रोड, बाजीप्रभु चौक, इंदिरा गांधी चौक, पाटकर रोड, चिपळूणकर रोड, चार रस्ता आदी भागामध्ये कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाच्या पोलिस उपनिरिक्षक राजश्री शिंदे, पोलिस नाईक सचिन गवळी, संतोष ठाकुर, निलेश झेमसे यांच्यासह सहका-यांना १०४ वाहन चालक बेशिस्त असल्याचे आढळून आले. त्यामध्ये ६२ रिक्षाचालक, ४२ दुचाकीस्वार, ३ कार चालक, ३ टेम्पोचालक आदींवर कारवाई झाली.

यापैकी बहुतांशी वाहनांना दंड भरल्यानंतर सोडण्यात आल्याचेही सांगण्यात आले. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचे सत्र कमी अधिक प्रमाणात सुरूच असते, पण त्यासाठी शहरातील वाहनचालकांचे सहकार्य अपेक्षित आहे. नियम तोडणे, बेशिस्त वागणे, बेदरकारपणे वाहन चालवणे हे नियमबाह्य आहे. असे कृत्य करून काही उपद्रवी वाहनचालक शहराच्या वाहतूकीची शिस्त मोडण्याचा प्रकार करत आहेत. काही वाहनचालक सातत्याने दिसन येत असल्याचेही नीदर्शनास आले असल्याचे सांगण्यात आले. सततच ठिकठिकाणी कारवाई सुरू असल्याचे शिंदे म्हणाल्या.

Web Title: from 110 byrled drivers recovered 20 thousand rupees in Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.