‘आनंद भारती’चा १११ वा गणेशोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:48 AM2021-09-10T04:48:05+5:302021-09-10T04:48:05+5:30
ठाणे : पूर्वेत १० ते १९ सप्टेंबरदरम्यान कोरोना नियमांचे पालन करून १११ वा श्री गणेशोत्सव, श्री आनंद भारती ...
ठाणे : पूर्वेत १० ते १९ सप्टेंबरदरम्यान कोरोना नियमांचे पालन करून १११ वा श्री गणेशोत्सव, श्री आनंद भारती समाज सभागृहात साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यवाहक संदीप कोळी यांनी दिली.
ठाणे नगरीचा हा आद्य सार्वजनिक गणेशोत्सव आहे. त्याअंतर्गत १५ सप्टेंबरला ७० व्या नाखवा स्मारक वार्षिक शैक्षणिक समारंभाचे आयोजन केले आहे. यंदाच्या दहावी शालान्त परीक्षेत नौपाड्याच्या सरस्वती सेकंडरी स्कूलची समृद्धी माने ९८.२० टक्के गुण संपादन करून ठाणे केंद्रात सर्वप्रथम आल्याबद्दल तिचा ७० वे कै. यशवंत ल. नाखवा स्मारक पारितोषिक देऊन गौरव करण्यात येणार आहे. याच परीक्षेत राबोडीच्या सरस्वती हायस्कूलची मैथिली वायकर हिने ८५.८० टक्के गुण संपादन करून संस्थेतील सभासदांच्या पाल्यात प्रथम आल्याबद्दल तिचा ६९ वे कै. दगडू पांडू नाखवा स्मारक पारितोषिक देऊन गौरव करण्यात येणार आहे. या वेळी समाजाचे अध्यक्ष रमाकांत कोळी, कार्याध्यक्ष हरेश्वर मोरेकर व उपाध्यक्ष प्रकाश ठाणेकर व्यासपीठावर उपस्थित असतील.
------------------