पालघरमध्ये ८ रस्त्यांसाठी १,१२४ कोटी
By admin | Published: January 4, 2017 01:10 AM2017-01-04T01:10:34+5:302017-01-04T01:10:34+5:30
पालघर जिल्हयातील ८ प्रमुख रस्त्यांसाठी केंद्र सरकारने ११२४ कोटीचा निधी मंजूर केला आहे. त्यात पालघर-परनाली पालघर मनोर रस्ता, परनाली-बोईसर-पचाळी
विक्रमगड : पालघर जिल्हयातील ८ प्रमुख रस्त्यांसाठी केंद्र सरकारने ११२४ कोटीचा निधी मंजूर केला आहे.
त्यात पालघर-परनाली पालघर मनोर रस्ता, परनाली-बोईसर-पचाळी-उमरोली-कोळगाव रस्त्याची सुधारणा, तारापूर औद्योेगिक क्षेत्रातील रस्त्याची सुधारणा, डहाणू-येथील झाई-बोर्डी- तारापूर- पर्णाली- माहीम सफाळे- पारगाव-वरई व सफाळे मांडा टेंभी खोडावे रस्त्याची सुधारणा करणे, चिंचणी-आशागड-उधवा रस्त्याच्या दुपदरीकरण-रूंदीकरण व पेव्हर शोल्डर सह बांधकाम, वाडा-देवगाव रस्ता सुधारणा, खांबाला-तिलोंड-कासा-तलवाडा विक्रमगड पाली-रस्त्याची सुधारणा, टेंभा खर्डी जव्हार, बोपादरी रुईनगर रस्त्याची सुधारणा, मोखाडा-कसारा-डोळखांब-टोकावडे- वैशाखरे आदी रस्यांची सुधारणा करायची आहे. पालघरचे पालक मंत्री-विष्णू सवरा यांच्या मागणीनुसार केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भरीव निधी दिला आहे.