ठाणे जिल्ह्यातील ११३४६३५ बँक खाते आधार कार्डशी जोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 07:17 PM2017-12-19T19:17:18+5:302017-12-19T19:18:08+5:30
जिल्ह्यातील १३ लाख ५७ हजार ४८६ बँकेत खाते असलेल्या नागरिकांपैकी ८३ टक्के म्हणजे ११ लाख ३४ हजार ६३५ नागरिकांनी त्यांचे बँक खाते आधारकार्डशी (लिंक) जोडण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत उघड
* डिजटल पेमेंटसाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: डिजिटल इंडियाच्या दृष्टीने ठाणे जिल्ह्यातील बँकांनी युध्दपातळीवर उपक्रम हाती घेतले आहेत. यापैकी जिल्ह्यातील १३ लाख ५७ हजार ४८६ बँकेत खाते असलेल्या नागरिकांपैकी ८३ टक्के म्हणजे ११ लाख ३४ हजार ६३५ नागरिकांनी त्यांचे बँक खाते आधारकार्डशी (लिंक) जोडण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत उघड झाले.
बँक खात्यांना आधारशी जोडण्याचे काम राज्यभरासह ठाणे जिल्ह्यात देखील झपाट्याने सुरु असल्याची माहिती बँक आॅफ महाराष्ट्र या लीड बँकचे मुख्य व्यवस्थापक अनिल सावंत यांनी मंगळवारी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या अध्य्क्षतेखाली झालेल्या बैठकीत उघड केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समितीसभागृहताही बैठक दिर्घ सुरू होती. जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये १३ लाख ५७ हजार ४८६ खाते आहेत. यापैकी ११ लाख ३४ हजार ६३५ म्हणजे ८३ टक्के खात्यांना आधारशी जोडशी जोडण्याचे काम पूर्ण झाले आहेत. याशिवाय नऊ लाख ४४ हजार ७४३ (७० टक्के) रूपे कार्डस खातेदारांना देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील खातेदारांपैकी तीन लाख ३२ हजार ७५९ खाती झिरो बॅलन्सची असल्याचे निदर्शनात आल्याची माहिती या आढावा बैठकीत उघड झाले आहे.
रूपे कार्ड हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने तयार केलेली प्लास्टिक कार्ड असून या कार्डमार्फत केलेल्या व्यवहारांवर अतिशय कमी शुल्क लागते. तसेच सर्व प्रकारच्या इलेक्ट्रोनिक व्यवहारांसाठी वापरण्यास अतिशय सोपे व सुरळीत असल्याची माहिती यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून देण्यात आली आहे.डिजिटल पेमेंटचा अधिकाधिक वापर करावा म्हणून प्रादेशिक परिवहन विभाग, महावितरण, सर्व तहसील कार्यालये, शिधावाटप यंत्रणा तसेच इतर शासकीय कार्यालयांमधून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकाºयांनी उपस्थिताना दिले. या वेळी बँकांना सुद्धा त्यांची बचत खाती मोबाईल तसेच आधारशी संलग्न करण्याचे काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सोबतच लोकांमध्ये देखील जागृती व्हाव्ही यासाठी काही अभिनव उपक्रम येणाºया काळात हाती घेण्यात येणार आहेत. विशेषत: विद्यार्थी, रिक्षा संघटना, छोटे व्यापारीआदींची मदत घेण्यात येणार आहे .