ठाण्यात एका कोरोनाबाधिताच्या मृत्युमुळे ११४ लोकांना व्हावे लागले कॉरंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 10:48 PM2020-04-21T22:48:24+5:302020-04-21T23:39:36+5:30

झांजेनगर भागातील एका ५५ वर्षीय व्यक्तीच्या मृत्युनंतर त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याच्या अंत्यविधीला गेलेल्या ११४ व्यक्तींना आता कोरंटाईन करण्यात आले आहे. खबरदारी म्हणून लोकमान्यनगरचा संपूर्ण परिसर सील केला असून औषधांच्या दुकानाव्यतिरिक्त इतर सर्व दुकाने २६ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

114 people quarantined due to death of a corona virus paitient in Thane | ठाण्यात एका कोरोनाबाधिताच्या मृत्युमुळे ११४ लोकांना व्हावे लागले कॉरंटाईन

लोकमान्यनगरचा प्रगाग क्रमांक सहाचा परिसराला केले सील

Next
ठळक मुद्दे लोकमान्यनगरचा प्रगाग क्रमांक सहाचा परिसराला केले सील पोलिसांनीही केली नाकाबंदीहाय रिस्कमधील ७२ लोकांना केंद्रामध्ये तर ४२ लोकांना केले होम कॉरंटाईन

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: लोकमान्यनगर पाडा क्रमांक तीन येथील झांजेनगर भागातील एका ५५ वर्षीय व्यक्तीच्या मृत्युनंतर त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याच्या अंत्यविधीला गेलेल्या ११४ व्यक्तींना आता कोरंटाईन करण्यात आले असून प्रभाग क्रमांक सहाचा संपूर्ण परिसर हा ठाणे महापालिका आणि पोलिसांनी सील बंद केला आहे.
प्रकृती बिघडल्यामुळे या व्यक्तीला १७ एप्रिल रोजी ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले होते. त्याचा १८ एप्रिल रोजीच मृत्यु झाला. तो कोरोनाबाधित असल्याचा अहवाल १९ एप्रिल रोजी आला. त्यामुळे त्याच्या अंत्ययात्रेला गेलेल्या परिसरातील हाय रिस्कमधील ७२ लोकांना केंद्रामध्ये तर लो रिस्कमधील ४२ लोकांना होम कॉरंटाईन केले आहे. अशा ११४ नागरिकांना विलगीकरणामध्ये ठेवल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. खबरदारी म्हणून या परिसरात कोणताही संसर्ग होऊ नये, यासाठी २० एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ते २६ एप्रिल रोजी रात्री १२ वाजेपर्यंत औषधांची दुकाने वगळता सर्व प्रकारची दुकानेही बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
* ही दुकाने राहणार बंद
मासळी, मटण, चिकन, अन्नधान्याची दुकाने, बेकरी आदी आवश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्यां दुकानांसह भाजीपाला आणि फळांची दुकाने तसेच दूध, अन्नधान्य आणि भाजीपाल्याची घरपोच सेवाही बंद केली आहे. याकाळात औषधांची दुकाने आणि दूध डेअरी ही सोशल डिस्टसिंगचे पालन करुन चालू ठेवण्यात येणार आहेत.
* लोकमान्यनगर सावरकरनगर प्रभाग समितीमधील प्रभाग क्रमांक ६ मधील सर्व दुकाने बंद केल्याने या भागातील अनेक रस्ते येण्या जाण्यासाठी वर्तकनगर पोलिसांनी पूर्णपणे बंद केले आहेत. या काळात कोणीही विनाकारण फिरतांना आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
‘‘ संबंधित रुग्ण मृत पावल्यानंतर त्याचा अहवाल दुसºया दिवशी पॉझिटिव्ह मिळाला. त्यामुळे खबरदारी म्हणून कोणालाही या संसर्गाचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी प्रभाग क्रमांक ६ चा परिसर पूर्णपणे सील केला आहे. शिवाय, मेडिकल वगळता सर्व दुकानेही सहा दिवस बंद करण्याचे आदेश दिले आहेत.’’
अशोक बुरपुल्ले, उपायुक्त, परिमंडळ ३, ठाणे महापालिका

 

Web Title: 114 people quarantined due to death of a corona virus paitient in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.