कल्याण-डोंबिवली महापालिकेत ११८ प्रभाग, निवडणूक आयोगाचे शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 12:40 AM2020-07-18T00:40:48+5:302020-07-18T00:41:07+5:30

महापालिकेत ११८ प्रभाग राहतील, यावर आयोगाने शिक्कामोर्तब केले असून, त्यानुसार प्रभागरचना करण्याचे निर्देश दिले आहेत. गावे वगळण्यापूर्वी महापालिकेत २७ गावांचे एकूण २१ प्रभाग होते.

118 wards in Kalyan-Dombivali Municipal Corporation, sealed by Election Commission | कल्याण-डोंबिवली महापालिकेत ११८ प्रभाग, निवडणूक आयोगाचे शिक्कामोर्तब

कल्याण-डोंबिवली महापालिकेत ११८ प्रभाग, निवडणूक आयोगाचे शिक्कामोर्तब

Next

कल्याण : केडीएमसीतील २७ गावांपैकी नऊ गावे महापालिकेत ठेवण्याबाबतची अधिसूचना राज्य सरकारने काढल्यानंतर निवडणूक आयोगानेही केडीएमसीच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. या बदलांमुळे आता महापालिकेत ११८ प्रभाग राहणार असून, त्यावर आयोगाने शिक्कामोर्तब केले आहे. त्याप्रमाणे प्रभागरचनेचे काम सुरू करा, असे निर्देशही दिले आहेत.
महापालिकेत ११८ प्रभाग राहतील, यावर आयोगाने शिक्कामोर्तब केले असून, त्यानुसार प्रभागरचना करण्याचे निर्देश दिले आहेत. गावे वगळण्यापूर्वी महापालिकेत २७ गावांचे एकूण २१ प्रभाग होते. यातील १२ प्रभाग ‘ई’ वॉर्डमध्ये तर नऊ प्रभाग ‘आय’ वॉर्डमध्ये होते. परंतु, आता १८ गावे वगळल्याने नऊ प्रभागांचा ‘आय’ वॉर्ड पूर्णपणे महापालिकेतून बाद होईल, तर ‘ई’ वॉर्ड महापालिकेत कायम राहील. दरम्यान, वगळलेल्या १८ गावांमधील १३ नगरसेवकांचे पद बाद करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असताना आता बदललेल्या हद्दीच्या आधारे आयोगाच्या निर्देशानुसार प्रभागरचनेला प्रारंभ होणार आहे.

२०११ च्या लोकसंख्येच्या आधारावर निवडणूक
केडीएमसीची निवडणूक २०११ च्या जनगणनेनुसार होणार आहे. त्यानुसार, केडीएमसी हद्दीतील लोकसंख्या १२ लाख ४७ हजार ३२७ असली, तरी २७ गावांच्या समावेशामुळे ती १५ लाख १८ हजार ७६२ पर्यंत पोहोचली होती. दरम्यान, १८ गावे आता वगळल्यामुळे आता लोकसंख्या १३ लाख ३७ हजार ६८१ इतकी राहिली आहे.

Web Title: 118 wards in Kalyan-Dombivali Municipal Corporation, sealed by Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.