नोकरीचे आमिष दाखवून १२ लाखांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:28 AM2021-06-03T04:28:46+5:302021-06-03T04:28:46+5:30
--------------------------------------------------- सोनसाखळी लंपास कल्याण : पश्चिमेकडील सांगळेवाडी परिसरात राहणाऱ्या भारती गढरी या सोमवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान त्या राहत ...
---------------------------------------------------
सोनसाखळी लंपास
कल्याण : पश्चिमेकडील सांगळेवाडी परिसरात राहणाऱ्या भारती गढरी या सोमवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान त्या राहत असलेल्या परिसरातील शिरीष बिल्डिंग समोरून जात होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून पलायन केले. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
--------------------------------------
दोघांना मारहाण
कल्याण : पूर्वेकडील काटेमानिवली परिसरात राहणाऱ्या अमन शर्मा आणि त्याचा मित्र ऋषीकेश कहार या दोघांना यश म्हात्रे, वाडी उर्फ वैभव उज्जैनकर आणि अन्य एकाने सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजता मागील भांडणाचा राग मनात धरून वीट आणि कडाप्याने प्रहार करून जखमी केले. याप्रकरणी अमनच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात यश, वैभव आणि अन्य एकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
---------------------------------------
सोन्याचे दागिने लंपास
कल्याण : पूर्वेकडील तिसगांव परिसरात राहणाऱ्या कुंदा गायकवाड यांचे तिसाई किराणा दुकान आहे. या दुकानात ४० वयोगटातील एक व्यक्ती बिस्किटचा पुडा घेण्याच्या बहाण्याने आली आणि त्याने इथे देवीचे मंदिर कुठे आहे अशी विचारणा केली. तसेच त्याच्याजवळील फुलांचे हार दाखवित तुम्ही जर या फुलांच्या हारास तुमच्या जवळील सोने लावले तरी तुमचे दुकान जोरात चालेल असे बोलून कुंदा यांचा विश्वास संपादन केला. यानंतर त्यांच्याजवळील ७५ हजार रुपयांचे दागिने हाराला लावण्याच्या निमित्ताने घेऊन पोबारा केला. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-------------------------------------------------
वादातून हल्ला
डोंबिवली : लोढा पलावा येथे राहणारे आनंदकुमार दुबे यांच्याबरोबर मुंबईच्या शीव येथे राहणारे अनिल उपाध्याय, दीपक उपाध्याय आणि राज उपाध्याय या तिघांचा अमरावती पेट्रोलपंपावरून गेले महिनाभर वाद सुरू आहे. याचा राग मनात धरून सोमवारी तिघांनी दुबेंना रॉडने मारहाण करून चाकूने त्यांच्या हातावर वार केले. याप्रकरणी दुबे यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
------------------------------------------------------
चेन लंपास
डोंबिवली : पूर्वेकडील दावडी गाव परिसरात राहणाऱ्या फळविक्रेत्या गायत्री पाठक या सोमवारी सकाळी नऊ वाजता आर.टी.स्कूलच्या समोरील फळांच्या दुकानात असताना दुचाकीवरून दोन अनोळखी व्यक्ती आल्या. त्यातील एकाने गायत्री यांना एक हजार रुपये दिले. राम मंदिरात अर्पण करा, त्यास तुमच्या गळ्यातील सोन्याच्या चेनचा स्पर्श करा अशी बतावणी करून त्यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन हातचलाखीने दोघांनी लंपास केली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
------------------------------------------------------