कचऱ्याच्या गाडीखाली सापडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:40 AM2021-05-23T04:40:38+5:302021-05-23T04:40:38+5:30

कल्याण : रस्त्यावर खेळत असताना एका १२ वर्षीय मुलाचा कचऱ्याच्या गाडीखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी कल्याण ...

A 12-year-old boy was found dead under a garbage truck | कचऱ्याच्या गाडीखाली सापडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

कचऱ्याच्या गाडीखाली सापडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

Next

कल्याण : रस्त्यावर खेळत असताना एका १२ वर्षीय मुलाचा कचऱ्याच्या गाडीखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी कल्याण पूर्व भागातील हनुमाननगर परिसरात घडली. या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.

हनुमानगर परिसरात दुपारी काही मुले खेळत होती. त्यावेळी अमित धाकड या मुलाचा चेंडू रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेला. त्यावेळी चेंडू घेऊन परत येत असताना त्या ठिकाणी रस्त्यावर कचऱ्याची गाडी मागे वळत होती. त्यावेळी तिच्या मागच्या चाकाखाली आल्याने चाकाखाली चिरडून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कळताच आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला तातडीने महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, त्या ठिकाणी तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित आहे. अमितची आई ऊर्मिला ही चार मुलांसह या परिसरात राहते. मुलाच्या मृत्यूची घटना कळताच तिने टाहो फोडला. या घटनेमुळे या परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी कचरागाडी चालकास ताब्यात घेतले आहे.

Web Title: A 12-year-old boy was found dead under a garbage truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.