ठाणे जिल्ह्यातील १२० मुख्याध्यापक-शिक्षकांना बाल लैंगिक शोषण प्रतिबंधात्मक धडे!
By सुरेश लोखंडे | Published: March 24, 2023 06:22 PM2023-03-24T18:22:01+5:302023-03-24T18:22:10+5:30
डोंबिवली (पू.) येथील संत तुलसीदास हिंदी माध्यमिक हायस्कूलमध्येही मुंबई स्थित अर्पण फाऊंडेशने बाल सुरक्षा मोहीम ही कार्यशाळा गुरूवार, शुक्रवार या दोन दिवसाच्या कालावधीत घेतली, असे शहापूरच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा खर्डी नंबर १ शाळेचे मुख्याध्यापक सुधीर भोईर यांनी लोकमतला सांगितले.
ठाणे : ‘बाल लैंगिक शोषणास’ प्रतिबंध करणाऱ्या वैयक्तिक सुरक्षा शिक्षण या दोन दिवसीय कार्यक्रमात जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक तसेच केंद्र प्रमुख आदींना बाल लैगिक शोषण प्रतिबंधात्मकतेचे धडे देण्यात आले. डोंबिवली (पू.) येथील संत तुलसीदास हिंदी माध्यमिक हायस्कूलमध्येही मुंबई स्थित अर्पण फाऊंडेशने बाल सुरक्षा मोहीम ही कार्यशाळा गुरूवार, शुक्रवार या दोन दिवसाच्या कालावधीत घेतली, असे शहापूरच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा खर्डी नंबर १ शाळेचे मुख्याध्यापक सुधीर भोईर यांनी लोकमतला सांगितले.
शाळांमध्ये वैयक्तिक सुरक्षा शिक्षण लागू करण्यासह पालक व प्रौढ भागधारकांसह या विषयावर सत्र या कार्यशाळेत आयोजित करून मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होण्यास या कार्यशाळेचा लाभ मिळण्याची अपेक्षा आयोजकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. या मोहिमेव्दारे ठाणे जिल्ह्यतील आदर्श शाळा शिक्षकांसाठी हा उपक्रम घेण्यात आला. यात जवळपास १२० शिक्षकांनी सहभाग घेतला.आदर्श शाळा हा महाराष्ट्र शासनाचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. या आदर्श शाळा उपक्रमात बाल लैंगिक शोषण या मुद्द्याची ओळ, मुल आणि मुलांचे अधिकार, बाल शोषण आणि बाल लैंगिक शोषणाचे प्रकार, आकडेवारी, बाल लैंगिक शोषणाचा अल्पकालीन आणि दीर्घकालीन प्रभाव, पोक्सो कायदा आणि तरतूदी आदींचे धडे या कार्यशाळेत देण्यात आले आहे.
लैंगिक शोषण टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यक्रम "वैयक्तिक सुरक्षा शिक्षण" ही माहिती ६ ते १६ वयोगटातिल मुलांसाठी, गोष्टींवर आधारित वैयक्तिक सुरक्षा शिक्षण आणि आॅनलाईन ई-लर्न कोर्सचा परिचय व प्रतिबंधात्मक धड़े देऊन, जीवन कौशल्यवर आधारित माहिती देऊन मुलांचे सक्षमीकरण कसे करावे इत्यादी माहिती शिक्षकांना यावेळी देण्यात आली.