तीन दिवसांत १२५ तक्रारींचा निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:26 AM2019-06-14T00:26:35+5:302019-06-14T00:26:49+5:30
आपत्तीसाठी यंत्रणा सज्ज : ठामपाची माहिती
ठाणे : संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. तसेच मागील तीन दिवसांत झालेल्या पडझडींच्या काळात पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन, वृक्ष प्राधिकरण व अग्निशमन विभागाने १२५ तक्रारींचा निपटारा केला आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि उद्यान विभागाने तत्काळ प्रतिसाद दिला आहे. पावसाळ्यात कोणत्याही परिस्थितीत जीवितहानी होणार नाही यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी दक्ष राहण्याच्या कडक सूचना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिल्या असून त्यानुसार आपत्कालीन परिस्थितीवर अधिकारी लक्ष ठेवून आहेत.
शहरातील प्राप्त होणाºया तक्र ारींच्याबाबतीत अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क असून नागरिकांकडून प्राप्त होणाºया तक्रारींना आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाकडून ताकाळ प्रतिसाद दिला जात आहे. गुरुवारी स्टेशन परिसरात पडलेले जाहिरातीचे फलक व गोखले रोडवर उन्मळून पडलेले झाड तत्काळ हटवून वाहतुकीसाठी रोड मोकळा करून देण्यात आला. मागील दोन दिवसही त्यानुसार प्रतिसाद दिल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागास १ आॅक्टोबर २०१९ ते १२ जून २०१९ या कालावधीत धोकादायक झाडे, झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी एकूण ४५७ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ४३० अर्जांना वृक्ष प्राधिकरणाने परवानगी दिली असून धोकादायक झाडे, त्यांच्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत. तरी ज्या नागरिकांना आपल्या परिसरातील धोकादायक फांद्या छाटायच्या आहेत त्यांनी वृक्ष प्राधिकरण विभागास अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.