ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या १२५९ रुग्णांची नव्याने भर; ३६ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 08:42 PM2020-10-15T20:42:44+5:302020-10-15T20:42:59+5:30
ठाणे मनापा परिसरात ३४९ नवे रुग्ण आढळून आले असून आज पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
ठाणे : जिल्ह्यात एक हजार २५९ रुग्ण गुरुवारी आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ९७ हजार रुग्ण बाधीत झाले आहेत. तर, आज ३६ जणांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या चार हजार ९८३ झाली आहे, अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली आहे.
ठाणे मनापा परिसरात ३४९ नवे रुग्ण आढळून आले असून आज पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात आजपर्यंत ४२ हजार ६२६ बाधीत रुग्ण झाले असून एक हजार ८६ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. कल्याण-कल्याण डोंबिवलीत नव्याने २५१ रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्ण संख्या ४७ हजार १४९ झाली आहे. आज आठ जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तार्पयत या शहरात ९३० जणांचा मृत्यू झालेला आहे.
उल्हासनगर शहरात २१ नवे रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. आता कोरोना रुग्णाची संख्या नऊ हजार ७६४ झाली आहे. तर मृतांची संख्या ३२१ नोंदवण्यात आली आहे. भिवंडी शहरात ४२ बाधीत आढळून आले असून आज एकही मृत्यू झाला नाही. या शहरात आतापर्यंत पाच हजार ५७४ बाधीत असून मृतांची संख्या ३२६ आहे. मीरा भाईंदरमध्ये १६२ रुग्णांची तर आज सहा मृत्यूची नोंद झाली आहे. या शहरात २० हजार ९६७ बाधितांसह ६५७ मृत्यू झाले आहे.
अंबरनाथमध्ये १६ रूग्ण सापडले असून आज दोघा मृतांची नोंद आहे. आता बाधितांची संख्या सहा हजार ८९३ असून मृत्यू २५३ आहेत. बदलापूरमध्ये ३० रुग्णांचा नव्याने शोध लागल्यामुळे आता बाधीत सहा हजार ८३६ झाले आहेत. या शहरात आज सहा मृत्यू झाले आहेत. त्यामुळे मृत्यूची संख्या ९३ झाली आहे. जिल्ह्यातील गांवपाड्यांमध्ये ४० रुग्ण आज सापडले असून चार मृत्यू झाले आहेत. या क्षेत्रात १५ हजार ८०८ बाधीत झाले असून मृतांची संख्या ४८२ वर गेली आहे.