ठाण्यातील १२७ भाग मायक्रो कंटेन्मेंट झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:41 AM2021-04-07T04:41:33+5:302021-04-07T04:41:33+5:30

ठाणे : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने ठामपाने मागील महिन्यापासून मायक्रो कंटेन्मेंट झोन घोषित करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, आता ...

127 part micro containment zone in Thane | ठाण्यातील १२७ भाग मायक्रो कंटेन्मेंट झोन

ठाण्यातील १२७ भाग मायक्रो कंटेन्मेंट झोन

Next

ठाणे : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने ठामपाने मागील महिन्यापासून मायक्रो कंटेन्मेंट झोन घोषित करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, आता या झोनमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. सर्वाधिक मायक्रो कंटेन्मेंट झोन माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीत आहेत. विशेष म्हणजे, याच भागात मागील महिन्यापासून सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. सध्या या भागात एक हजार २४० सक्रिय रुग्ण असून शहरात १२७ मायक्रो कंटेन्मेंट झोन असून, त्यातील ४९ झोन हे केवळ माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत आहेत.

ठामपा हद्दीत आतापर्यंत ८५ हजार ४०६ कोरोनाबाधित आढळले आहेत. पैकी ७१ हजार ६७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, हे प्रमाण ८४ टक्के आहे. तर, एक हजार ४१३ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या शहरात १२ हजार ३१४ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ८० टक्क्यांहून अधिक रुग्ण घरीच, तर उर्वरित रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. शहरात सध्या दररोज १५००च्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यातही रोजच्या रोज एकट्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीत ५००च्या आसपास रुग्ण आढळत आहेत. त्या तुलनेत शहराच्या इतर भागांत १०० ते २००च्या आसपास रुग्णसंख्या आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ठामपाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पाचपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या इमारती तसेच परिसरांना मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. सरकारच्या आदेशानुसार ठामपा प्रशासनाने शहरातील १२७ मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले आहेत. या इमारती तसेच परिसरातील नागरिकांमुळे शहराच्या दुसऱ्या भागांमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी ही उपाययोजना केली जात आहे. त्यातही यामध्ये माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीत सर्वाधिक ४९ कंटेन्मेंट झोन आहेत.

मायक्रो कंटेन्मेंट झोनवर दृष्टिक्षेप

प्रभाग समिती - मायक्रो कंटेन्मेंट झोन - रुग्णसंख्या

माजिवाडा-मानपाडा - ४९ - १२४०

उथळसर - १४ - १२४

दिवा - ४ - ३५

नौपाडा-कोपरी - २२ - ६५

वागळे इस्टेट - ४ - ३१

कळवा - ३ - -

लोकमान्य-सावरकर - ११ - १४३

वर्तकनगर - २० - ७७८

मुंब्रा - - -

एकूण - १२७ - २४३४

Web Title: 127 part micro containment zone in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.