श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्राच्या १२ कोटी आवर्तनाचा महासंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 05:34 AM2019-02-12T05:34:01+5:302019-02-12T05:34:15+5:30

गीता फाउंडेशन, मिरजचे संस्थापक विश्वस्त दिलीप आपटे गुरुजी यांच्या वतीने श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्राची १२ कोटी आवर्तने संपूर्ण महाराष्ट्र व इतर राज्यांतून येत्या १० वर्षांत पूर्ण करण्याचा महासंकल्प के ला आहे.

 The 12th anniversary of Shri Vishnu Sahasranamototra | श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्राच्या १२ कोटी आवर्तनाचा महासंकल्प

श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्राच्या १२ कोटी आवर्तनाचा महासंकल्प

Next

- जान्हवी मोर्ये

ठाणे : गीता फाउंडेशन, मिरजचे संस्थापक विश्वस्त दिलीप आपटे गुरुजी यांच्या वतीने श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्राची १२ कोटी आवर्तने संपूर्ण महाराष्ट्र व इतर राज्यांतून येत्या १० वर्षांत पूर्ण करण्याचा महासंकल्प के ला आहे. या महासंकल्पाला सुरुवात झाली आहे. या आवर्तनांची नोंद लिम्का बुक आॅफ रेकार्डमध्ये करण्याचा प्रयत्न असल्याचे या महासंकल्पाचे ठाणे गटप्रमुख सुनील देशपांडे यांनी सांगितले.
सुमारे १२ कोटी श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्राचा प्रयोग प्रथमच करण्यात येत आहे. संस्थेतर्फे यापूर्वी तीन हजार नागरिकांना घेऊन आवर्तनांचा प्रयोग केला होता. या आवर्तनपठणाला १ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. या महासंकल्पात नागरिकांनी घरात दररोज किमान दोनदा (म्हणजेच महिन्यातून ६० वेळा) स्तोत्रपठण करायचे आहे. तसेच आठवड्यातून एकदा किंवा दोनदा एकत्र जमून सामूहिक ठिकाणी आवर्तने करायची आहेत. यासाठी जातपात, स्त्री किंवा पुरुष असे कोणतेही बंधन नाही.
संस्थेतर्फे २३ गटप्रमुख नेमण्यात आले आहेत. आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून १२ हजार लोकांनी आपली नावनोंदणी केली आहे. त्यांनी आतापर्यंत ९०,२२३ आवर्तने केली आहेत. संस्थेने आपली एक वेबसाइट तयार केली आहे. त्या वेबसाइटवर प्रत्येकाने आपल्या आवर्तनांची नोंद करायची आहे. या वेबसाइटवर श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्राचे महत्त्व, त्याचे फायदे सांगण्यात आले आहेत.
श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्रामुळे आत्मविश्वास वाढतो. सामूहिक ठिकाणी सुरू असलेल्या आवर्तनाला दिलीप आपटे गुरुजी भेट देणार असून नागरिकांना त्यांच्या प्रवचनाचा लाभ मिळणार आहे. या महासंकल्पात जास्तीतजास्त नागरिकांनी सहभागी व्हावे. लोकसहभाग वाढल्यास हा महासंकल्प येत्या सहा वर्षांतच पूर्ण होईल, असा विश्वासही देशपांडे यांनी व्यक्त केला.

ठाण्यातील विठ्ठल मंदिरात पठण
ठाण्यातील विठ्ठल मंदिरात १५ दिवसांपासून श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राचे पठण केले जात आहे. हे पठण कल्याण, नाशिक, पुणे, मुंबई, सोलापूर, सांगली, नाशिक अशा सर्वच ठिकाणी सुरू आहे. सध्या मराठी व कन्नड भाषिक आवर्तनेच पठण करत आहेत. कन्नडमधील तुमकुर आणि बंगळुरू येथे आवर्तनांचे पठण सुरू आहे.

Web Title:  The 12th anniversary of Shri Vishnu Sahasranamototra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.