बारावी निकाल: ठाणे जिल्ह्याचा निकाल 92 टक्क्यांहून अधिक; पुन्हा एकदा मुलींनी मारली बाजी
By प्रज्ञा म्हात्रे | Published: May 21, 2024 02:41 PM2024-05-21T14:41:03+5:302024-05-21T14:41:20+5:30
मुलींचा 94.07% निकाल तर मुलांचा निकाल 90.23%
प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: या वर्षीचा बारावीचा निकाल जाहीर झाला असून ठाणे जिल्ह्याचा निकाल 92.08% इतका लागला आहे गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली असून मुलींचा 94.07% निकाल लागला आहेत तर मुलांचा निकाल 90.23% इतका लागला आहे.
जिल्ह्यात एकूण 89 हजार 935 इतकी विद्यार्थी पास झाले असून त्यामध्ये 44 हजार 280 इतक्या मुली पास झाल्या आहेत तर 45 हजार 655 इतकी मुले पास झाली आहेत. दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर झाला त्यामुळे इंटरनेटवर सायबर कॅफेमध्ये घरी मोबाईलवर विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहिला आणि पास झालेल्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. जिल्ह्यातील एकूण 98 हजार ००२ इतक्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती त्यातील 50,775 मुले आणि 47 हजार 227 मुलींचा समावेश होता. 97662 विद्यार्थी परीक्षेला बसले होते यात 50 हजार 593 मुले आणि 47 हजार 69 मुलींनी परीक्षा दिली.
जिल्ह्यातील 7727 विद्यार्थी नापास
ठाणे जिल्ह्यातून 97,662 इतकी विद्यार्थी परीक्षेला बसली होती त्यातली 7727 विद्यार्थी नापास झाले. नापास होणाऱ्यांमध्ये मुले मात्र आघाडीवर आहेत. बारावीचा निकालामध्ये 97 हजार 662 पैकी 89 हजार 935 विद्यार्थी जिल्ह्यातून पास झाले आहेत त्यातून 7727 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत असे निकालावरून स्पष्ट होते. यात मुलांमध्ये 50 हजार 593 मुले परीक्षेला बसले होते त्यातील 4938 मुले नापास झाली आहेत, तर 47 हजार 069 मुली परीक्षेला बसल्या होत्या त्यापैकी 2789 मुली नापास झाले आहेत.