ठाणे जिल्ह्यात आढळले १३४१ नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 03:09 AM2020-08-22T03:09:27+5:302020-08-22T03:09:33+5:30
ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात १८२ नवे रुग्ण सापडल्याने शहरात २४ हजार १९५ रुग्णांची नोंद झाली आहे.
ठाणे : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे नवे एक हजार ३४१ रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या एक लाख १२ हजार ६०० वर पोहोचली आहे. तर, ३६ जणांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यातील मृतांचा आकडा तीन हजार २१४ झाल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली.
ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात १८२ नवे रुग्ण सापडल्याने शहरात २४ हजार १९५ रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय, आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या ७७८ झाली आहे. कल्याण-डोंबिवली मनपात ४२४ रुग्ण नव्याने आढळून आले. तर, आठ जणांचा मृत्यू झाला. यामुळे शहरातील मृतांची संख्या ५३८, तर बाधितांचा आकडा २५ हजार ९८४ झाला आहे.
नवी मुंबईत ३३२ रुग्णांची नोंद झाली असून सहा रुग्ण दगावले आहेत. आता बाधितांची संख्या २२ हजार ६०७, तर मृत्यूची संख्या ५३१ वर गेली आहे. उल्हासनगरला ३५ रुग्ण नव्याने आढळले आहेत. या शहरात आतापर्यंत सात हजार ५३६ बाधित रुग्णांची नोंद घेण्यात आली. तर, पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे २०५ मृतांची नोंद आतापर्यंत झाली आहे.
भिवंडी मनपा कार्यक्षेत्रात १५ रुग्ण नव्याने सापडले असून तीन मृत्यूंची नोंद झाली आहे. यासह आतापर्यंत चार हजार २५ बाधितांसह २८१ मृतांची नोंद करण्यात आली आहे. मीरा-भार्इंदर महापालिकेमध्ये १२० रुग्णांसह तीन जणांच्या मृत्यंूची नोंद झाली. या शहरात आता बाधितांची संख्या ११ हजार ३९५, तर मृतांची संख्या ३८३ झाली आहे.
अंबरनाथ शहरात ५४ रुग्ण नव्याने आढळून आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. या शहरात आता चार हजार ६३९ बाधित, तर १७८ मृतांची नोंद झाली आहे. याप्रमाणेच बदलापूरमध्ये ४८ रुग्ण सापडल्यामुळे बाधित रुग्ण तीन हजार ७१८ झाले आहेत. मृतांची संख्या ६५ कायम आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्राही १३१ रुग्णांची वाढ झाली असून दोन मृत्यू झाले आहेत. या गावपाड्यांत आतापर्यंत आठ हजार ५०१ बाधितांची तर २५६ मृतांची नोंद झाली आहे.