मानवाधिकाराचा संदेश देत १३५ तृतीयपंथी ठाण्यातील रस्त्यावर धावले

By प्रज्ञा म्हात्रे | Published: October 9, 2022 04:07 PM2022-10-09T16:07:53+5:302022-10-09T16:08:44+5:30

१५ ते १८ वयोगटातील मुलींमध्ये गायत्री शिंदे प्रथम, मीरा फाटक द्वितीय आणि अपूर्वा देशमुख हिने तृतीय क्रमांक पटकाविला.

135 Transgender ran on the streets of Thane carrying the message of human rights | मानवाधिकाराचा संदेश देत १३५ तृतीयपंथी ठाण्यातील रस्त्यावर धावले

मानवाधिकाराचा संदेश देत १३५ तृतीयपंथी ठाण्यातील रस्त्यावर धावले

googlenewsNext

प्रज्ञा म्हात्रे

ठाणे -  'तृतीयपंथीयांचे हक्क हा मानवाधिकार आहे' अशा घोषणा देत रविवारी सकाळी सहा वाजता ठाणे जिल्ह्यातील तब्बल १३५ तृतीयपंथीय ठाण्यातील रस्त्यावर धावले. निमित्त होते एम स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आणि संकल्प केअर यांच्या सहकार्याने आयोजित 'एक मैल' दौडचे' ठाण्यातील पाचपाखाडी सर्व्हिस रोड येथे या 'एक मैल' दौडचे आयोजन करण्यात आले. १५ ते १८, १९ ते २९, ३० ते ४४, ४५ ते ६० या वयोगटातील मुले, मुली, पुरुष, महिला आणि जेष्ठांसाठी या एक मैल दौडचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला ठाणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. तर ठाणे जिल्ह्यातून १३५ तृतीयपंथी या स्पर्धेत सहभागी झाले होते. 

१५ ते १८ वयोगटातील मुलांमध्ये यश माबेकर प्रथम, स्वराज गावकर द्वितीय आणि गौरव आर्या याने तृतीय क्रमांक पटकाविला. १९ ते २९ वयोगटातील मुलांमध्ये अजय यादव प्रथम, रवी सोनकर द्वितीय आणि सदाफल चव्हाण याने तृतीय क्रमांक पटकाविला. ३० ते ४४ वयोगटातील मुलांमध्ये नारायण बागवडे प्रथम, शान सिन्हा द्वितीय तर गंधर्व शेट्टी हा तिसरा आला. ४५ वर्षांपुढील वयोगटात प्रथम अमित प्रभू, द्वितीय भास्कर कृष्णमूर्ती तर तिसरा क्रमांक शैलेश सापळे याने पटकाविला. 

१५ ते १८ वयोगटातील मुलींमध्ये गायत्री शिंदे प्रथम, मीरा फाटक द्वितीय आणि अपूर्वा देशमुख हिने तृतीय क्रमांक पटकाविला. १९ ते २९ वयोगटातील  मुलींमध्ये पूनम गुप्ता प्रथम, लेखना कणेकर द्वितीय आणि लता सोलंकी हिने तृतीय क्रमांक पटकाविला. ३० ते ४४ वयोगटातील महिलांमध्ये हेता ठक्कर प्रथम, दीपल पटेल द्वितीय तर मंजिरी प्रभू यांनी तिसरा क्रमांक पटकाविला. ४५ वर्षांपुढील महिला वयोगटात प्रथम संगीता खेतान, द्वितीय मिनी सुबोध तर तिसरा क्रमांक धरती पोंडा यांनी पटकाविला. तृतीयपंथीमध्ये रुपाली केणे प्रथम, अंजली केणे द्वितीय आणि मलिका केणे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. आयोजक डॉ. अजित कुलकर्णी यांनी यावेळी स्पर्धा आयोजित करण्या मागचा उद्देश सांगत  तृतीयपंथीय खेळाडूंचे आभार मानले. 

उर्मी इस्टेट चे विनोद गोवानी, संकल्प केअर चे अध्यक्ष डॉ. पी. एन. कदम, संकल्प केअर चे सीईओ सतीश रामानंदन, फ्रँकलिन चे स्वरूप भाटवडेकर, उपजिल्हाधीकारी रेवती गायकर, अक्षयशक्ती च्या संस्थापक मिनी सुबोध, महाराष्ट्र ऍथलिटिक चे माजी सहसचिव प्रसाद पाठक, स्पोर्ट्स अथॉरीटी ऑफ इंडियाच्या कायदेशीर सल्लागार गीतांजली शर्मा आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी क्रिडा क्षेत्रातील योगदानाबद्दल लोकपूरम शाळेचे डॉ. राकेश यादव, रमेश दळवी, प्रमोद कुलकर्णी, वसंत विहार शाळेचे ऍथलिटिक कोच सुनील होनमाने, छत्रपती पुरस्कार विजेते म्हापुस्कर, ठाणे जिल्हा ऍथलिटिक असोसिएशनचे सचिव अशोक अहिरे, सहसचिव राजेंद्र मयेकर आदींचा सत्कार करण्यात आला.

Web Title: 135 Transgender ran on the streets of Thane carrying the message of human rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.