ठाणे जिल्ह्यातील बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी  १३८ जणांना अट, २३ शस्त्र जप्त 

By सुरेश लोखंडे | Published: May 3, 2024 01:51 AM2024-05-03T01:51:02+5:302024-05-03T01:51:29+5:30

जिल्ह्यातील सध्याच्या या निवडणुकीच्या या कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणेकडून १६ मार्च ते ३० एप्रिलला या कालव्यातून धडक कारवाई केली आहे.

138 persons have been sentenced for possession of illegal weapons in Thane district, 23 weapons have been seized | ठाणे जिल्ह्यातील बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी  १३८ जणांना अट, २३ शस्त्र जप्त 

ठाणे जिल्ह्यातील बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी  १३८ जणांना अट, २३ शस्त्र जप्त 

ठाणे : जिल्ह्यातील निवडणुकीच्या या १५ दिवसाच्या कालावधीत जिल्ह्यात ठिकठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकूण १५५ गुन्हे दाखल करण्यात आले असून १३८ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ११ पिस्टल, दोन रिव्हॉल्व्हर,  ९ गावठी कट्टे, एक एअर गन, असा एकूण सात लाख २९ हजार  रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच ४८ जिवंत काडतुसे जप्त केली आहे.तत्याची किंमत सहा लाख.११ हजार ९५० आहे., १४९ कोयता, चॉपर, चाकू, सुरा, तलवार, किंमत रु. ३५ हजार ३७५,  १० मोबाईल व ९ वाहनेही जप्त करण्यात आले असून ९०० रु. रोख रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील सध्याच्या या निवडणुकीच्या या कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणेकडून १६ मार्च ते ३० एप्रिलला या कालव्यातून धडक कारवाई केली आहे.

प्रतिक्रिया कारवाईचे एकूण ३१९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये पाच हजार ५३१ लिटर दारु, २४१ एमएल (७१ हजार ३३० लिटर वॉश), किंमत- रुपये ३० लाख ८५ हजार १३०, रोख रक्कम २६ हजार ६६० रुपये आणि एक टेम्पो, एक  कार, एक मोबाईल व एक मोटारसायकल जप्त करण्यात आले आहेत.. कल्याण लोकसभा मतदारसंघात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार २५, प्रतिबंधात्मक कारवाईच्या २११ , बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी ७२ व एक इतर गुन्हे दाखल झाले आहेत. -तर ठाणे लोकसभा मतदारसंघात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार ९, प्रतिबंधात्मक कारवाईचे ३० आणि आर्म अँक्टसंबंधीचे ३७ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

अंमली पदार्थ विरोधी कारवाईत एकूण ३९ गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन हजार ८६०..१२ किलोग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली. त्याची किंमत २७ कोटी ८२ लाख ४९ हजार २०२ रुपये आहे.कोकीन पावडर २७.०५ ग्रॅम जप्त करण्यात आली असून किंमत-११ लाख रुपये आहे. गांजा ३७ किलो २७३ ग्रॅम जप्त केला असता त्याची किंमत सहा लाख ४३ हजार ४५० आहे. ), कफ सिरफ श१८ बॉटल असून किंमत तीन हजार ५१० रूपये, ब्राऊन शुगर १०४  ग्रॅम असून किंमत पाच लाख २० हजार आहे. असा एकूण २८ कोटी चार लाख ३५ हजार ५६२ रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. तसेच सात वाहने व १४ मोबाईलसह एक लाख ९३ हजार १३० रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

 बेकायदेशीरपणे गुटखा बाळगणे व विक्रीसंदर्भात एकूण १५ गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये ७५ लाख २१ हजार ५३८ किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात पाच  वाहन व चार मोबाईल सह इतका मुद्देमाल  जप्त करण्यात आला असून ७०० रुपये रोख रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे. तसेच विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात पाच लाख ४० हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.
 

Web Title: 138 persons have been sentenced for possession of illegal weapons in Thane district, 23 weapons have been seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.